
महिलेनं एकाच वेळी दिला चार मुलांना जन्म; कुटुंबाला चौपट आनंद
एखाद्या घरात लहान बाळाचा जन्म झाला की अख्खं कुटूंब आनंदून जाते. या आनंदाची सीमाच असते. त्यात जर जुळं झालं तर हा दुप्पट होतो. परंतु मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एका महिलेने आपल्या कुटूंबाला चौपट आनंद दिला आहे. कारण तिनं एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात बालकांमध्ये तीन मुलगे आणि एक मुलगी आहे. चार मुलांच्या जन्मामुळे तिचं कुटूंब आनंदी आहे, मात्र या चारही बाळांची प्रकृती ठीक नसून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. (The woman gave birth to four children at the same time in Balaghat Madhya Pradesh)
हेही वाचा: असा झाला 'लावणी'चा जन्म; जाणून घ्या इतिहास
बालाघाटमध्ये एकाचवेळी चार अपत्यांचा जन्म होण्याची ही पहिलीच घटना आहे. 23 मे रोजी जिल्हा रुग्णालय बालाघाटमध्ये किरणापूर तहसीलच्या जराही गावात राहणाऱ्या 26 वर्षीय प्रीती नंदलाल मेश्राम हिने चार मुलांना जन्म दिला. रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रिया करून चारही बालकांना सुखरूप बाहेर काढले. ऑपरेशन करणाऱ्या टीममध्ये डॉ. रश्मी वाघमारे, भूलतज्ज्ञ डॉ. दिनेश मेश्राम आणि स्टाफ सिस्टर सरिता मेश्राम यांचा समावेश होता.
हेही वाचा: 30 वर्षांचा तरुण 47 मुलांचा बाप; आणखी 10 मुलांचा होणार जन्म
जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक व सिव्हिल सर्जन डॉ.संजय धाबरगावे यांनी सांगितले की, जन्मानंतर बालकांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत देखरेख करत आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) डॉ.निलय जैन यांनी सांगितले की, अशा प्रकारचं ऑपरेशन करणं खूपच कठीण असते. ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचेही त्यांनी कौतुक केले.
Web Title: The Woman Gave Birth To Four Children At The Same Time In Balaghat Madhya Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..