30 वर्षांचा तरुण 47 मुलांचा बाप; आणखी 10 मुलांचा होणार जन्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Father

30 वर्षांचा तरुण 47 मुलांचा बाप; आणखी 10 मुलांचा होणार जन्म

एक ३० वर्ष वयाचा अविवाहित मुलगा आणि तब्बल ४८ पोरांचा बाप आणि अजून १० मुलांचा होणार जन्म. ऐकून धक्का बसला असेल ना? हे कसं शक्य होऊ शकतं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. त्यातून या मुलाचं लग्नही झालं नाही म्हणजे काहीतरी घोळ आहे असं आपल्याला वाटलं असेल पण तुम्हाला अशक्य वाटणारी ही गोष्ट खरी आहे.

हा मुलगा आहे कॅलिफोर्नियाचा. किल कॉर्डी असं या तरुणाचं नाव असून त्याचं वय अवघं ३० वर्ष इतकं आहे. त्याला ४७ मुलं होण्याचं कारण म्हणजे तो 'स्पर्म डोनर' आहे. तो जगभरातील तब्बल ५० मुलांचा जैविक पिता आहे. आणि अजून १० मुलांचा तो बाप होणार आहे. म्हणजे तो आता एकून ५७ मुलांचा बाप आहे पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक जीवनात काही समस्यांचा सामना करत आहे कारण महिला त्याच्याशी फक्त आपल्याला बाळ होण्यासाठी जवळीक करतात पण त्याच्यासाठी जीवनभर साथ द्यायला कुणीच तयार नाहीये.

हेही वाचा: 52 रुपयांना बीअर अन् 350 रुपयाला रम; गुजरातमध्ये दारुचे भाव एवढे कमी?

सध्या त्याच्या आयुष्यात कुणीच दीर्घकालीन नातेसंबंध ठेवायला तयार नाही, त्याला सध्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी कुणीच साथ देत नाही असं तो बोलताना म्हणाला. तसेच त्याने अनेक महिलांना मुल होण्यासाठी मदत केली आणि त्यांचे संसार सुखी केल्यामुळे तो समाधानी असल्याचं त्याने सांगितलंय.

"मी सध्या स्पर्म डोनेशन प्रवासात असून जगभरातील माझ्या मुलांना भेटण्याचा माझा प्रवास सुरु आहे. त्यांना भेटून मला खूप आनंद होत आहे आणि भेटल्यावर मी त्यांच्यासोबत फोटो काढतो." असं त्याने बोलताना सांगितलं. त्याने आठ वर्षापूर्वीपासून स्पर्म डोनेशनचं काम सुरु केलं असून आत्तापर्यंत जवळपास एक हजार महिलांना त्याने स्पर्म डोनेट केले आहे.

हेही वाचा: मनसेचा अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं हे कारण

त्याने सांगितले की, पहिल्या काही डोनेशननंतर काही महिला गरोदर राहिल्या आणि त्यानंतर त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन जाहिरात करणं सुरु केलं. त्यानंतर त्याला डोनेशनसाठी फोन येऊ लागले. अनेक महिलांना याबाबत उत्सुकता असते पण त्या पैसे देऊन स्पर्म बॅंकमध्ये जातात. इंग्लंडमधील महिलांना माझ्याबद्दल जास्त आकर्षण आहे असं तो म्हणाल्याचं माध्यमाच्या रिपोर्टनुसार समजतंय.

Web Title: Story Of 30 Year Old Young Father Of 57 Children

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsfather and son
go to top