Video : आवरा! चप्पल दाखवून महिलेने मगरीला लावलं पळवून

Video : आवरा! चप्पल दाखवून महिलेने मगरीला लावलं पळवून

मगर(crocodile) ही अत्यंत भयानक दिसते. आपण मगर प्राणीसंग्रहालयात जरी पाहिली, तरी तिचं रुप पाहून अंगावर काटा उभा राहतो आणि मग आपण घाबरत-घाबरतच तिच्या जवळ जातो. पण मगर जर मुक्त संचार करणारी असेल तर? अशावेळी तिच्यापासून सुरक्षित अंतर राखण्यातच शहाणपणाचं ठरेल. पण एका महिलेने मात्र भलतंच धाडस दाखवलंय.

एक मगर तिच्याकडे येत असल्याचे पाहून घाबरून पळून न जाता तिने मगरीला पायातील चप्पल(slippers) दाखवली. विशेष म्हणजे हे पाहून मगरीनेही पुन्हा पाण्यात धूम ठोकली(crocodile run away). या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (the woman made the crocodile run away Showing the slippers video Viral)

या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक महिला नदीच्या काठावर कुत्र्यासोबत उभी असल्याचे दिसत आहे. कुत्रा तिच्या अवतीभोवती फिरत आहे. ती तिथे उभी राहिली असताना तिथं पाण्यातून एक महाकाय मगर पाण्याच्या आतून त्यांच्याकडे येताना दिसते. ती मगरीला पाहत होती; पण ती अजिबात भांबावून गेली नाही. ती तशीच काठावर उभी होती. ती मगर आता खूपच जवळ आली होती. आश्चर्य म्हणजे तरीही ती महिला घाबरून पळून गेली नाही. तिने थेट पायातली चप्पल काढली आणि मगरीकडे ती दाखवली. तिने ती चप्पल स्वतःच्या हातावर मारली आणि मगरीवर ओरडली.

Video : आवरा! चप्पल दाखवून महिलेने मगरीला लावलं पळवून
लग्न करताय? सहा महिने आधीच करा 'या' महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट

आता मगरीला बाईच्या या हरकतींकडे पाहून काय वाटलं ते जाणे, पण ती तिथून पुन्हा पाण्यात निघून गेली. या महिलेच्या नादालाच लागायला नको असंच तर त्या मगरीला वाटलं नसेल?

फ्रेड शुल्ट्झने याने हि व्हिडीओ क्लिप ट्विटरवर शेअर केली असून ही क्लिप तब्बल १.९ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. नेटिझन्सनीही यावर भरभरून कमेंट केल्या आहेत. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टचे कॅप्शनही तितकंच मजेदार आहे, “आई जेव्हा बूट काढते, तेव्हा त्याचा काय अर्थ होतो हे प्रत्येकाला माहित आहे,'' असं ते कॅप्शन आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही मजेशीर प्रतिक्रीया दिल्या. महिलेची ही कृती ही एकाला वैश्विक भाषा वाटते. तर आणखी एक जण प्रतिक्रिया देताना म्हणतो की महिला खुपच धाडसी दिसतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com