लग्न करताय? सहा महिने आधीच करा 'या' महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट | lifestyle News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्न करताय? सहा महिने आधीच करा 'या' महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट

जोडीदारासह संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याचे वचन देण्यापूर्वी, एकेमेकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आणि आवश्यक तपासणी करून घेण्याचे वचन घेतले पाहिजे'

लग्न करताय? सहा महिने आधीच करा 'या' महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट

sakal_logo
By
शरयू काकडे

कोणत्याही जोडप्याच्या जीवनातील लग्न हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यासाठी त्यांनी एकत्र निरोगी जीवन निर्माण करण्यासाठी अनेक तयारी करणे आवश्यक आहे, त्यासाठी अनेक पूर्वअटी आहेत .अनेकांना अशा नात्यातील रोमँटिक, भावनिक आणि आर्थिक पैलूंना महत्त्व देतात पण बरेचदा लोक आरोग्याच्या पैलूकडे मात्र दुर्लक्ष करतात.

लग्नापूर्वी आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्येक कपल त्यांच्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात; एकेमेकांच्या सवयी काय, वैशिष्टये काय, काय आवडते, काय आवडत नाही ई. आणि या सर्व अनुभवातून जात आजीवन वचनबध्द राहण्यासाठ वेळ लागतो. परंतु तुमच्या जोडीदाराबाबत आनुवंशिक घटक जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. ''जोडीदारासह संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्याचे वचन देण्यापूर्वी, एकेमेकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आणि आवश्यक तपासणी करून घेण्याचे वचन घेतले पाहिजे'', असेही तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञांचे मतानुसार, एक लग्नापूर्वी योग्य आरोग्य तपासणी गेल्यामुळे निःपक्षपाती आरोग्य पुरावाही मिळतो. जी जोडपी लग्नाचा विचार करत आहे ते, लग्नापूर्वी तपासण्या करतात, त्यांना माहित नसलेले किंवा लपवलेले आजार आणि धोके शोधण्यास मदत होते. तसेच जोडीदाराला अनुवांशिकता जाणून घेऊन आवश्यक खबरदारी किंवा उपचार करण्यासाठी मदत होते.

''जोडप्यांना लग्नाच्या सहा महिने आधी तपासणी करून घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात''

जोडप्यांनी शिफारस केलेल्या चाचण्या कराव्यात:

1. लैंगिक संक्रमित रोग(Sexually-transmitted diseases): एचआयव्ही, हिपॅटायटीस बी आणि सी हे आजार आयुष्यभर राहणारे आहेत ज्यांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास, विवाहित जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो. सिफिलीस, गोनोरिया आणि नागीणसाठी देखील चाचण्या केल्या पाहिजेत.

2. आनुवंशिकने संक्रमित होणारे रोग (Inherited diseases): हिमोफिलिया, थॅलेसेमिया, मारफान सिंड्रोम, हंटिंग्टन रोग आणि सिकलसेल यांसारखे रक्तजन्य रोग अनुवाशिंकतेने संक्रमित होण्याची दाट शक्यता असते, म्हणून त्यांची चाचणी केली पाहिजे.

3. प्रजनन क्षमता( Fertility) : हे महत्वाचे आहे कारण प्रजनन समस्यांशी संबंधित अनावश्यक जैविक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आघात न करता शक्य तितक्या लवकर शोधणे करणे आवश्यक आहे.

4. रक्तगट सुसंगतता चाचणी(Blood group compatibility test): अनेक जोडप्यांना रक्त तपासणी करणे गरजेचे वाटत नाही, परंतु यामुळे त्यांना आरएच फॅक्टरबद्दल जाणून घेण्यास मदत होऊ शकते. यशस्वी गर्भधारणेसाठी जोडप्याचा आरएच घटक समान असावा. जर तो जुळत नसेल तर ते मुलासाठी धोकादायक असू शकते. गर्भवती महिलांच्या रक्तातील अँटीबॉडीज बाळाच्या रक्तपेशी नष्ट करू शकतात.

5. अनुवांशिक तपासणी (Genetic screening) : चवीला प्राधान्य देणे, पौष्टिक आहाराची आवश्यकता, अलर्जी असलेले पदार्थ , फिटनेस दिनचर्या निश्चितपणे बहुतेक जोडप्यांसाठी महत्त्वाचे असतात. अनुवांशिक तपासणी केवळ आरोग्याच्या परिस्थितीशी संबंधित अनुवांशिक प्रवृत्ती समजून घेण्यास मदत करू शकत नाही, परंतु वैयक्तिकृत पोषण आणि फिटनेसची माहितीही देखील देऊ शकते.

loading image
go to top