esakal | ...तर तिथल्या तिथं राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले
sakal

बोलून बातमी शोधा

Then would have resigned says Udayan Raje Bhonsale

तर तिथल्या तिथं राजीनामा दिला असता. वेंकय्या नायडू यांनी शिवाजी महाराजांचा अवमान केलेलाच नाही - उदयनराजे भोसले यांचा खुलासा 

...तर तिथल्या तिथं राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले

sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे : राज्यसभेत खासदारपदाची शपथ घेताना उपराष्ट्रापती वेंकय्या नायडू यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणताही अवमान केलेला नाही. वाटल्यास शरद पवारांना विचारा. जर अवमान झाला असता, तिथल्या तिथं राजीनामा दिला असता, तुम्हाला माझा स्वभाव माहिती  आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण गुरुवारी केले. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यसभेत शपथ घेताना उदयराजे भोसले यांनी जयभवानी, जय शिवाजी, अशी  घोषणा दिली होती. त्याला काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता. या घटनेबाबत उदयनराजे भोसले म्हणाले, इतर सदस्यांनी आक्षेप घेतल्यावर, नायडू यांनी त्यांना थांबविले. या सभागृहात मी सांगतो त्यानुसारच कामकाज होईल. राज्यघटनेनुसार दिलेली शपथच सदस्यांनी घ्यावी, बाकीच्या गोष्टी रेकॉर्डवर येणार नाहीत, असे म्हटले होते. हा एवढाच प्रकार झाला. त्यावेळी सभागृहात शरद पवारही उपस्थित होते. हवे तर त्यांना विचारा, असे उदयनराजे दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले. 

या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने नायडू यांना 20 लाख पत्र पाठविण्याचे ठरविले आहे, असे भोसले यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर ते म्हणाले, 20 लाख काय, आणखी कोणी पत्र पाठवावे, लोकशाहीत तो प्रत्येकाचा हक्क आहे. पण इतक खरं आहे की, मी सभागृहात होतो. जर महाराजांचा अवमान झाला असता तर मी तिथल्या तिथ राजीनामा फेकला असता, कारण महाराजांच्या वंशात माझा जन्म झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

नॉन इश्यूचा काहीजण इश्यू करीत आहेत, असेही भोसले यांनी स्पष्ट केले. या बाबत शिवसेनेचे संजय राऊत यांनी आक्षेप घेतला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर, भोसले यांनी राऊत यांच्याबाबत काय बोलणार, ते महान आहेत. त्यांनी मलाच महाराजांच्या वंशात असल्याचे पुरावे मागितले होते. बाळासाहेब ठाकरे हे मोठेच नेते आहे. पण, छत्रपती शिवाजी महाराज मोठे का, बाळासाहेब ठाकरे, हे त्यांनी सांगावे. तसे असेल तर, शिवसेनेचे नाव ठाकरे सेना करावे, असेही भोसले यांनी स्पष्ट केले. 

ज्या सदस्यांनी जय भवानी, जय शिवाजी या घोषणेवर आक्षेप घेतला, त्यांचा तुम्हीच राजीनामा मागा, माझ्या राजीनाम्याच्या मागे का लागलात, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घोषणेवर नायडू यांनी नाही तर, कॉंग्रेसच्या एका सदस्याने आक्षेप घेतला होता. मास्क लावला असल्यामुळे त्यांची मला आेळख पटलेली नाही, असेही उदयनराजे यांनी स्पष्ट केले.