झारखंडमध्ये जिंकलो, हेमंत सोरेन मुख्यमंत्री होणार : तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
Monday, 23 December 2019

महाआघाडीने मोठे यश मिळविले आहे. भाजपकडून सत्ता घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत.

पाटना : झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही झारखंड निवडणुकीत महाआघाडीत लढलो आहोत. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील, असे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र पाठोपाठ आणखी एक राज्य गमवण्याच्या मार्गावर आहे. झारखंडमध्ये आज (सोमवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून, जेएमएम-काँग्रेसने महाआघाडीने मुसंडी मारली आहे. झारखंडमध्ये 81 विधानसभा जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. सत्तेत येण्यासाठी कुठल्याही पक्षाला 41 हा बहुमताचा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र मागील विधानसभेत 37 जागा मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत मात्र मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे. तर महाआघाडी सत्तास्थापनेच्या जवळ पोहचली आहे.

भाजप अजून एक राज्य गमावणार? काँग्रेसची मुसंडी...

या निकालाबद्दल एएनआयशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, की महाआघाडीने मोठे यश मिळविले आहे. भाजपकडून सत्ता घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढलो होतो. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is going to be a clean sweep for Mahagathbandhan says Tejashwi Yadav