भाजप अजून एक राज्य गमावणार? काँग्रेसची मुसंडी...

वृत्तसंस्था
Monday, 23 December 2019

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र पाठोपाठ आणखी एक राज्य गमावण्याच्या मार्गावर आहे. झारखंडमध्ये आज (सोमवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून, काँग्रेसने मुसंडी मारली आहे.

रांची: भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र पाठोपाठ आणखी एक राज्य गमावण्याच्या मार्गावर आहे. झारखंडमध्ये आज (सोमवार) सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून, काँग्रेसने मुसंडी मारली आहे.

उद्याच होणार मंत्रिमंडळ विस्तार?; कोणाला मिळणार संधी

झारखंडमध्ये 81 विधानसभा जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. सत्तेत येण्यासाठी कुठल्याही पक्षाला 41 हा बहुमताचा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र मागील विधानसभेत 37 जागा मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत मात्र मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे.

जमियत उलेमा ए हिंद संघटनेकडून अमित शहांना धमकी

आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर भाजप 20, काँग्रेस 39, इतर नऊ पक्ष आघाडीवर आहे. यामुळे झारखंडमध्ये भाजपला मोठा धक्का असून, काँग्रेसने मुसंडी मारली आहे. काँग्रेसला बहुमत मिळवण्यासाठी फक्त एका जागेची आवश्यकता आहे.

देशात मुस्लिमांना धोका नाही - मोदी

दरम्यान, झारखंड विधानसभेसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया झाल्यानंतर जाहीर झालेल्या कल चाचण्यांमध्ये राज्यातील भाजप सरकार पुनरागमन करण्याची शक्‍यता धूसर असून, कॉंग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा-राजद आघाडीला 41 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. बिहारचे विभाजन करून झारखंडची 2000 मध्ये निर्मिती झाल्यापासून भाजपचे नेते रघुबर दास हे मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले नेते ठरले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jharkhand election results early trends show congress jmm ahead