देशातील भाविकांसाठी आहे आनंदाची बातमी; वाचा सविस्तर

Vishwanath-Temple
Vishwanath-Temple

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या ‘लॉकडाउन ५’मधील मार्गदर्शक सूचनांनुसार विविध राज्यांमधील मंदिरे सोमवारी भाविकांसाठी खुली झाली. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियमांप्रमाणेच मंदिरांसाठीच्या अन्य नियमावलीचे पालन करण्यात येत असल्याचे दिसून आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

उत्तर प्रदेश (काशी) 

  • विश्वनाथ मंदिरात सोमवारी विधिवत पूजा झाली.
  • भाविकांसाठी मंदिर मंगळवारी (ता. ९) खुले होणार.
  • आरतीनंतर उद्या प्रवेश देण्यात सुरुवात.
  • एका वेळी पाच भाविक दर्शन करू शकतील.
  • प्रवेशापूर्वी थर्मल तपासणी होणार.
  • तापमान योग्य असेल तरच प्रवेश.
  • स्वयंचलित सॅनिटायझेशन यंत्राची सोय करण्यात आली होती.
  • भाविकांसाठी सुरक्षा कक्षाची उभारणी करण्यात आली.

मथुरा 

  • श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर मात्र भाविकांसाठी सकाळी सात वाजल्यापासून सुरू.
  • कोरोनामुळे बाहेरील भाविक दिसले नाहीत.
  • स्थानिक भाविकांची मात्र दर्शनासाठी हजेरी.
  • सुरक्षित अंतरासाठी आखणी.
  • मुख्य द्वारावर थर्मल तपासणी.
  • सुरक्षा कर्मचाऱ्यांना ‘पीपीई’ संच. 
  • बांके बिहारी मंदिर ३० जूनपर्यंत बंद राहणार.
  • वृंदावन, बरसना, नदगाव आणि गोवर्धनमधील मंदिरे बंदच.

कर्नाटक 

  • राज्यातील बंगळूर व अन्य ठिकाणची काही मंदिरे खुली, काही बंद.
  • भाविकांची संख्या मर्यादित.
  • तीर्थ व प्रसाद वाटपाला परवानगी मिळालेली नाही.
  • पुढील आदेश येईपर्यंत यात्रा व पूजांवर बंदी.
  • निर्बंधांसह मशिदी खुल्या.
  • नमाजासाठी चटई व पाण्याची मशिदीत सोय करणार नाही.
  • घरीच प्रार्थना करण्याचे आवाहन.
  • बंगळूरमधील चर्च १३ जूनपर्यंत बंद राहणार आहेत.

नवी दिल्ली

  • प्रसिद्ध छत्तरपूर मंदिर परिसर आज सकाळी खुला.
  • पहिल्या एक तासात ३०० भाविकांची उपस्थिती.
  • मंदिराच्या दरवाजात सॅनिटायझेशन केंद्राची सोय.
  • भाविकांची थर्मल तपासणी.
  • देवासाठी हार-फुले वाहण्यास व प्रसादास बंदी.
  • जामा मशीद पहाटे पाचला पहिल्या नमाजासाठी बंद.
  • नमाजासाठी नियमांचे पालन.
  • बांगला साहिब, सिसगंज येथील गुरुद्वारात भाविकांची उपस्थिती.

अयोध्या 

  • दोन महिन्यांनंतर राम जन्मभूमी आणि हनुमानगढीचे दर्शन. 
  • शरयू नदीकिनारी भाविकांची स्नानासाठी गर्दी.
  • पाच भाविकांनाच एका वेळी स्नानासाठी परवानगी.
  • हनुमानगढीत नियमांचे पालन होत असल्याचे महंत राजू दास यांचा दावा.
  • भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था.

तेलंगण

  • भाविकांना दर्शन खुले, विशेष पूजांना बंदी.
  • हैदराबादमधील वेंकटेश्‍वर, श्रीराम मंदिर, श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिर खुले.
  • थर्मल तपासणीनंतरच प्रवेश, भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक.
  • सुरक्षित अंतराचे पालन, गाभाऱ्यात मर्यादित भाविकांचा प्रवेश. 
  • राज्याभरातील मंदिरांमध्ये भाविकांची लक्षणीय उपस्थिती.

ओडिशात ३० जूनपर्यंत बंद
केंद्र सरकारने आजपासून मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली असली, तरी ओडिशातील मंदिरांचे दरवाजे ३० जूनपर्यंत बंदच राहणार आहेत. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारचे मुख्य सचिव असित त्रिपाठी यांनी काल उशिरा दिला. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारी मंदिरे राज्य सरकारच्या परवानगीनुसार आजपासून खुली करावीत, असा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने काल सकाळी जाहीर केला होता. पण, जगन्नाथ मंदिर पाच जुलैपर्यंत बंद ठेवणार असल्याचे प्रशासकीय प्रमुख कृष्णन कुमार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com