Census : जनगणनेला निवडणुकीआधी मुहूर्त नाहीच! नागरिकांकडून घेणार संगणक, स्मार्टफोनची माहिती

Census
Census

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलेली देशाची जनगणना लोकसभा निवडणुकीच्याआधी होण्याची शक्यता कमीच आहे. आगामी सार्वत्रिक निवडणूक ‘एप्रिल-मे २०२४’ मध्ये होऊ शकते निवडणुकीच्या कामासाठीच मोठे मनुष्यबळ लागणार असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Census
Crime News : कोल्हापुरातील कुरिअरची! व्हॅन अडवून ११ तोळे सोने लुटले

या जनगणनेमध्ये ३१ विविध प्रकारचे प्रश्न विचारले जाणार असून, त्यामध्ये स्मार्टफोन, इंटरनेट, लॅपटॉप, संगणक, कार आणि दुचाकींचा वापर तसेच नागरिकांकडून तृणधान्याचे कितपत सेवन केले जाते? याचा समावेश आहे.

देशभरात साधारणपणे १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या काळामध्ये जनगणना करण्याचे नियोजन आखण्यात आले होते पण त्याचदरम्यान कोरोनाचा उद्रेक झाल्याने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होता. आता या जनगणनेला लोकसभा निवडणुकीच्या आधी मुहूर्त मिळण्याची शक्यता कमीच असून सरकारकडून नव्या तारखा जाहीर होण्याची शक्यताही कमीच असल्याचे बोलले जाते.

मध्यंतरी रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी नवे जिल्हे आणि उपजिल्ह्यांच्या निर्मितीची मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. नियमानुसार जिल्हे, उपजिल्हे, तहसील, तालुके आणि पोलिस ठाण्यांच्या प्रशासकीय सीमा निश्चित झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत जनगणना होणे अपेक्षित असते.

Census
Maharashtra Politics: रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर; म्हणाले ठाकरेंकडून...

प्रशिक्षणासाठी लागणार मोठे मनुष्यबळ

या जनगणनेमध्ये मोठ्या संख्येने मनुष्यबळ वापरण्यात येते त्यातही साधारणपणे शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी देखील दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतोच. भारतामध्ये साधारणपणे ३० लाख सरकारी कर्मचारी जनगणनेच्या कामासाठी वापरले जातात. आता निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीची तयारी केली असताना मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोग आणि रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांना त्यांच्या कामासाठी मोठ्या संख्येने सारखेच मनुष्यबळ लागणार असल्याने जनगणेच्या प्रक्रियेला ब्रेक लागू शकते असे बोलले जाते.

याचीदेखील नोंद होणार

घराच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य

घराची स्थिती नेमकी कशी आहे?

घरात एकूण किती व्यक्ती राहतात?

कुटुंबप्रमुख महिला आहे की पुरुष

जातीचीही नोंद घेतली जाणार

घरात नेमके किती विवाहित लोक आहेत?

प्रथमच स्वगणनेची संधी

उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करता जनगणनेची प्रक्रिया ही लोकसभा निवडणुकीच्यानंतरच होण्याची शक्यता आहे. आतादेखील जेव्हा कधी जनगणना होईल तेव्हा ती पहिल्यांदा डिजिटल पद्धतीने करण्यात येईल. यामुळे नागरिकांना प्रथमच स्वतःची गणना करण्याची संधी मिळेल. याबाबतचे पोर्टल लवकरच सुरू होऊ शकते. स्वगणनेच्या पद्धतीमध्ये आधार आणि मोबाईल क्रमांक देखील गोळा करण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com