Crime News : कोल्हापुरातील कुरिअरची! व्हॅन अडवून ११ तोळे सोने लुटले

Crime News
Crime Newssakal

काशीळ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एका कुरिअर कंपनीच्या वाहनाला अडवून त्यातील सोन्या-चांदीच्या नव्या दागिन्यांची लूट करण्यात आली. त्यानंतर चोरटे पसार झाले आहेत. फिर्यादीनुसार लूट झालेल्या ११० ग्रॅम सोने व १७ किलो चांदीच्या दागिन्यांची किंमत सुमारे १७ लाख ६२ हजार आहे. काशीळ (ता. सातारा) परिसरात रविवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास प्रकार घडला.

Crime News
Pune : ट्रक-बसचा अपघात! चांदणी चौक परिसरात लागल्या वाहनांच्या रांगा

संतकुमार उरणसिंग परमार (वय २५, सध्या रा. भेंडे गल्ली, कोल्हापूर, मूळ रा. जारगा ता. बसेरी, जि. धौलपूर, राजस्थान) यांनी एकूण नऊ अनोळखी चोरट्यांविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कोल्हापूर येथून संतकुमार परमार व गोलू दिनेश परमार शनिवारी रात्री दहा वाजता साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप व्हॅन (एमएच ४० बीपी ८४२७) मध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते.

काशीळ (ता. सातारा) च्या हद्दीत महामार्गावरील पुलावर त्यांच्या गाडीला चोरट्यांनी मोटार आडवी मारत जबरदस्तीने थांबवले. त्यानंतर मोटारीतून चार चोरटे पटकन खाली उतरून त्यांनी संतकुमार परमार व गोलू परमार यांच्या तोंडावर वेदनाशामक औषधाच्या स्प्रेचा फवारा मारत दोघांना खाली उतरविले. त्याचवेळी पाठीमागून दोन दुचाकींवरून आलेल्या चार व्यक्तींनी संतकुमार व गोलू यांना पकडून ठेवले.

Crime News
Maharashtra Politics: रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर; म्हणाले ठाकरेंकडून...

त्यावेळी चोरट्यांनी परमार यांच्या ताब्यातील सोन्या-चांदीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बॉक्स गाडीसह ताब्यात घेतले. त्यानंतर संतकुमार परमार व गोलू परमार यांना पकडून ठेवणारे दुचाकीस्वारसुद्धा त्यांना रस्त्याच्या कडेला ढकलून देऊन निघून गेले.

चोरट्यांनी कुरिअरची गाडी थोड्याच अंतरावर असलेल्या समर्थगाव (ता. सातारा) येथे नेऊन गाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील फक्त सोन्या-चांदीचे दागिन्यांचे बॉक्स व गाडीची किल्ली घेऊन पसार झाले.

याची माहिती मिळताच जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर यांनी पहाटेच घटनास्थळी भेट दिली. बोरगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखा, ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथक तसेच क्यूआरटीच्या पथकाने काशीळचा परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे तपास करत आहेत.

काय घडले?

पुणे-बंगळूर महामार्गावर काशीळजवळ प्रकार

शनिवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास चौघांनी मोटार आडवी मारत व्हॅन रोखली

दुचाकीवरून आलेल्यांनी कर्मचाऱ्यांच्या तोंडावर मारला स्प्रे

त्यांच्याकडील व्हॅन पळवून समर्थगावपर्यंत नेली

तेथे व्हॅनच्या दरवाजाचे कुलूप तोडले; फक्त सोन्या-चांदीचे दागिने लुटले

लुटलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १७ लाख ६२ हजार

सात संशयित पकडले!

दरम्यान, या घटनेनंतर चोरट्यांच्या मागावर पोलिस पथके पाठविण्यात आली असता सातारा पोलिसांना तीन, तर पुणे पोलिसांना चार अशा सात संशयितांना पकडण्यात यश आल्याचे सातारा पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com