लसीकरणाची कोणतीही निश्चित कालमर्यादा नाही - भारती पवार

लसीकरणाला होणारा विलंब आणि राज्यांना जाणविणारी लसटंचाई यावरून काँग्रेसकडून मोदी सरकारला सतत प्रश्न विचारले जात आहे.
Bharti Pawar
Bharti PawarSakal

नवी दिल्ली - 'देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी (Corona Vaccination) कोणतीही निश्चित कालमर्यादा (Fixed Time) ठरविलेली नाही", या आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांनी संसदेतील उत्तरावरून काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. (There is No Fixed Time Limit for Vaccination Bharti Pawar)

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लसीककरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याआधी भारती यांच्या, ऑक्सिजनअभावी कुणाचाही मृत्यू झालेला नाही, या उत्तरावरून चांगलाच गदारोळ झाला होता.

Bharti Pawar
मोठी बातमी! ICSE आणि ISC परिक्षांचा निकाल उद्या 3 वाजता

लसीकरणाला होणारा विलंब आणि राज्यांना जाणविणारी लसटंचाई यावरून काँग्रेसकडून मोदी सरकारला सतत प्रश्न विचारले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर लोकसभेत राहुल यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी लसीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केले. या वर्षाअखेर सर्व प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सरकारच्या योजनेबद्दल तसेच लस उपलब्धतेबाबत त्यांनी विचारणा केली होती.

या प्रश्नाच्या लेखी उत्तरात भारती यांनी सांगितले, की लसीकरण ही राष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाच्या देखरेखीखाली चालणारी गतीमान प्रक्रिया आहे. कोरोनाचे सतत बदलणारे स्वरुप लक्षात घेता लसीकरण मोहिम पूर्ण करण्यासाठी निश्चित अशी कालमर्यादा ठरविता येणार नाही. असे असले तरी डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत १८ वर्षांवरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणे अपेक्षित आहे.

दरम्यान, ऑॅगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये लशीचे १३५ कोटी डोस उपलब्ध होणार असून लसीकरण मोहिमेवर आतापर्यंत ९७२५.१५ कोटी रुपये खर्च झाल्याची माहितीही भारती यांनी दिली.

लसीकरणाबाबत राहुल गांधींनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाने मोदी सरकार पुरते उघडे पडले आहे. सरकार म्हणते, की लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केली जाऊ शकत नाही. आणि केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या तुलनेत लसीकरणावर आतापर्यंत केवळ ९७२५ हजार कोटी रुपयेच खर्च झाले आहेत.

- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com