'कोरोनील' औषधावर कसलीही बंदी नाही; रामदेव बाबांचा दावा

ramdev
ramdev

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसवर पतंजलीने तयार केलेल्या कोरोनील या आयुर्वेदिक औषधावर कोणतीही बंदी नाही आणि हे औषध देशभरात उपलब्ध होईल, असा दावा योगगुरु रामदेवबाबा यांनी बुधवारी केला. 

पत्रकार परिषदेत बोलताना रामदेवबाबा म्हणाले, ‘‘कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पतंजली काम करीत आहे. ‘उपचार’ हा शब्द वापरला नव्हता. या औषधात धातूची कोणताही घटक नाही. आयुष मंत्रालयाशीसंबंधित असलेल्या राज्य विभागाकडून आम्ही या औषधासाठी परवाना मिळविला आहे.’’ 

रस्ते अपघातग्रस्तांसाठी मोदी सरकारची मोठी योजना, लवकरच होणार सुरू
‘‘आयुष मंत्रालयाशी आमचे मतभेद नाहीत. आता कोरोनील, श्‍वासारी, गिलोय, तुळशी, अश्‍वगंधा यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. हे औषध (श्‍वासारी कोरोनील संच) कोणत्याही कायदेशीर आडकाठीशिवाय आजपासून देशभरात उपलब्ध होईल, असा दावा रामदेवबाबा यांनी केला. औषधावर कसलीही बंदी नाही. यासाठी मी आयुष मंत्रालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो, असेही ते म्हणाले. 

‘मोदी, शहांना भेटलो नाही’ 

‘कोरोनील’वर एवढा वाद होऊनही हे औषध बाजारात आणण्याची परवानगी कशी मिळाली, सरकारबरोबर तुम्ही कोणती तडजोड केली, असे विचारले असता रामदेवबाबा म्हणाले की, कोणतीही तडजोड केलेली नाही. यात कोणतीही लपवाछपवी नाही. मी लोकांचे भले चिंततो. मी पंतप्रधान कार्यालय किंवा अमित शहा यांच्या गृह मंत्रालयाशी चर्चा केलेली नाही. आयुष मंत्रालय सोडून कोणत्याही बड्या नेत्याबरोबरही बोललो नाही. ‘आयुष’ने सांगितले की, स्वामीजी तुम्ही ‘बरे करणे’ अशा शब्दांचा वापर करू नका, बाकी जे करीत आहात ते सुरू ठेवा. मंत्रालयाचा हा सल्ला आम्ही मानला आहे. 

कोरोनावरील औषधाच्या दाव्यानंतर त्यांच्यासह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बालकृष्ण यांच्याविरोधात जयपूर येथे ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. यावर रामदेवबाबा म्हणाले की, भारतात योग आणि आयुर्वेद क्षेत्रात काम करणे हा गुन्हा आहे, असेच यावरुन वाटते.

दरम्यान, कोरोना विषाणूवर प्रभावी म्हणून पतंजलीकडून कोरोनील औषधाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या औषधावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. भारत सरकारकडून या औषधाच्या जाहीरातीवर बंदी आणण्यात आली होती. तसेच आरोग्य विभागाने कोरोनीलला कोरोनावरील औषध म्हणून परवाना दिला नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com