काँग्रेसला धक्क्यावर धक्के! राज्यसभा निवडणुकीत होणार मोठा तोटा

Congress
Congress

गांधीनगर - गुजरातमध्ये 19 जून रोजी राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याआधीच काँग्रेसला मोठे धक्के बसत आहेत. काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. बृजेश मेरजा यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याआधी अक्षय पटेल आणि जीतू चौधरी या काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला होता. प्रवक्ते राजेंद्र त्रिवेदी यांनी दोन्ही आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गुजरात काँग्रेस कठीण प्रसंगातून जात आहे. मार्च महिन्यापासून काँग्रेसच्या 7 आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षात आता फक्त 65 आमदार राहिले आहेत. गुजरात विधानसभेच्या एकूण 172 जागा आहेत. त्यापेकी 10 जागा रिकाम्या झाल्या आहे.

19 जूनला राज्यसभेच्या 4 जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी भाजपने तीन तर काँग्रेसने दोन उमेदवार मैदानात उतरवले आहेत. नियमानुसार एका उमेदवाराच्या विजयासाठी 35.1 मतांची आवश्यकता असते. अशावेळी भाजपकडे 103 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे 68 आमदार आहेत. काँग्रेस भारतीय ट्राईबल पक्षाच्या दोन आमदारांना सोबत घेऊन दोन उमेदवार राज्यसभेवर पाठवण्याचे स्वप्न पाहात आहे. मात्र, एकएक करुन आमदार राजीनामा देत असल्याने काँग्रेसचे हे स्वप्न धुळीत मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, भाजपला राज्यसभेच्या 3 जागा जिंकण्यासाठी 106 आमदारांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपला आणखी तीन आमदारांची आवश्यकता लागणार आहे. भाजपने अभय भारद्वाज, रमीला बारा आणि नरहरी अमीन या उमेदवारांना राज्यसभेच्या मैदानात उतरवलं आहे. तर काँग्रेसने वरिष्ठ नेता शक्तिसिंह गोहिल आणि भरतसिंह सोलंकी यांना उमेदवार बनवलं आहे. भाजप 2 आणि काँग्रेस 1 जागा सहज जिंकू शकते. पण उरलेल्या एका जागेसाठी दोन्ही पक्षांना झगडावं लागणार आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये पुन्हा एकदा 2017 सारखी स्थिती निर्माण होऊ शकते. 2017 मध्ये भाजपने अशाच प्रकारे एक अतिरिक्त उमेदवार उभा करुन काँग्रेसच्या अहमद पटेल यांची जागा अडचणीत आणली होती. काँग्रेसच्या 6 आमदारांनी निवडणुकीच्या आधी राजीनामा दिला होता. एक मत रद्द झाल्याने कसंतरी अहमद यांचा विजय झाला होता. मात्र, काँग्रेसला यासाठी निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालय यांचे दरवाजे ठोठावे लागले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com