ब्रिटनला जाण्यासाठी असतील 'या' नव्या ट्रॅव्हल गाईडलाईन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

British Airways

ब्रिटनला जाण्यासाठी असतील 'या' नव्या ट्रॅव्हल गाईडलाईन

नवी दिल्ली : कोविशिल्डला परवानगी नाकारल्यानतर भारताचा दबाव वाढल्याने अखेर ब्रिटनला झुकावं लागलं आहे. त्यामुळं ब्रिटनने पुन्हा एकदा भारतात तयार झालेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता दिली आहे. तसेच याबाबत नव्या ट्रॅव्हल गाईडलाईन्सही जाहीर केल्या आहेत.

नव्या ट्रॅव्हल गाईडलाईन्स काय आहेत?

  1. ब्रिटनने काढलेल्या ताज्या ट्रॅव्हल गाईडलाईन्स चार ऑक्टोबरपासून पहाटे ४ वाजल्यापासून लागू होणार आहेत.

  2. ऑस्ट्रेलिया, अँटिग्वा आणि बारबुडा, बारबाडोस, बहारिन, ब्रुनै, कॅनडा, डॉमिनिका, इस्त्रायल, जपान, कुवैत, मलेशिया, न्यूझिलंड, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, दक्षिण कोरिया किंवा तैवान या देशांमधील सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनिका, पीफायझर बायोनटेक, मॉडर्ना किंवा जॉन्सन अँड जॉन्सन या लसींचे दोन्ही डोस घेतलेलं असणे आवश्यक आहे. युके, युरोप, युएसए आणि युकेमध्ये मान्यता असलेल्या लसीकरण कार्यक्रमानुसार हे गरजेचं आहे.

  3. एकच फॉर्म्युला असेलल्या अॅस्ट्राझेनेका कोविशिल्ड, अॅस्ट्राझेनेका वॅक्सझेवरिया, मॉडर्ना टाकेडा या लसींना युकेमध्ये मान्यता आहे. इंग्लंडमध्ये येण्यापूर्वी किमान १४ दिवस आधी या मान्यता असलेल्या लसींचा पूर्ण डोस झालेला असणे गरजेचं आहे.

  4. पूर्ण लसीकरणासाठी लसींचे दोन डोस घेणे गरजेचे आहेत. त्यानुसार, दोन भिन्न लसींचं मिक्सिंग असलेली लस घेतली तरी चालणार आहे. उदा. ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनिका आणि मॉडर्ना. त्याचबरोबर दोन भिन्न लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसींचे दोन डोस घेतलेले प्रवाशी देखील पात्र असतील. उदा. ऑस्ट्रेलिया आणि जपान, युके आणि युएसए, ईयु आणि कॅनडा आदी. यासाठी विविध देशांमधील लसीकरण कार्यक्रमानुसार लस घेतलेली असली तरी चालणार आहे.

  5. ४ ऑक्टोबरपर्यंत केवळ युके, युरोप, युएसए किंवा युकेमधील जागतीक लसीकरण कार्यक्रमात मिक्स लस घेतलेल्या लोकांना परवानगी असणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh news
loading image
go to top