अटल पेंशन योजनेत १ जुलैपासून होणार ‘हे’ बदल, कोणते आहेत ते बदल, वाचाच... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जगभर करोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळमुळे अटल पेंशन योजनेसाठी देण्यात येणारी रक्कम ऑटो डेबिट न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. अटल पेंशन योजनेत एक जुलैपासून काही बदल होणार आहे.

केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणारी अटल पेंशन योजना ही निवृत्तीनंतर दरमहा ठरावीक परतावा देणारी एक सरकारी पेंशन योजना आहे. ही भारत सरकारची योजना आहे. कोणीही भारतीय नागरिक यात सहभागी होवू शकतो. या योजनेचे जर तुम्ही खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. ती म्हणजे अटल पेंशन योजनेत एक जुलैपासून काही बदल होणार आहे. सरकारने अटल पेशंन योजनेसंदर्भात केलेले बदल पाहण्यासाठी https://www.npscra.nsdl.co.in/ या संकेतस्थळावर भेट दया.

जगभर करोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळमुळे अटल पेंशन योजनेसाठी देण्यात येणारी रक्कम ऑटो डेबिट न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
दररोज जगण्यासाठी संघर्ष करत असताना सुरक्षित भविष्याचा विचार करणे प्रत्येकालाच जमते असे नाही. असुरक्षित उत्पन्न आणि असंघटित रोजगाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि कोणत्याही पेंशन योजनेचा लाभ मिळत नसलेल्या व्यक्तींसाठी ‘अटल पेशंन योजना’ ही एक प्रकारे वृध्दापकाळात आर्थिक आणि सामाजिक संरक्षण देणारी योजना आहे. १८ ते ४० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ  शकतात. अटल पेंशन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रामुख्याने असंघटीत क्षेत्रातले कामगारांसाठी ही योजना आहे. 

अटल पेंशन योजना म्हणजे...
अटल पेंशन योजना म्हणजे भारतीय नागरिकांसाठी निवृत्ती योजना आहे. त्यांचे केंद्र हे असंघटीत क्षेत्रातील कामगार आहेत. या खातेधारकाला त्याच्या वर्गाच्या प्रमाणात त्याला वयाच्या ६० वर्षापासून मिळेल. ही भारत सरकारची योजना आहे. कोणीही भारतीय नागरिक यात सहभागी होवू शकतो. 

३० जूनपर्यंत थांबवण्यात आले होते ऑटो डेबिट...
१ जुलैपासून या योजनेत पैसे गुंतविणा-या खातेधारकांच्या खात्यातून त्यांचे पैसे आता ऑटो डेबिट केले जाणार आहेत. ११ एप्रिल रोजी करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘निवृत्तीवेतन नियमन आणि विकास प्राधिकरणातर्फे’ ३० जूनपर्यंत या योजनेची रक्कम ऑटो डेबिट न करण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. आता याचा कालावधी पूर्ण होणार असल्यानं याची रक्कम ऑटो डेबिट करण्यासंबंधी ग्राहकांना ईमेलद्वारे सूचना पाठवण्यात आले आहेत. ऑटो डेबिटमुळे आता काही ग्राहकांना समस्यांचा सामनादेखील करावा लागू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

३० सप्टेंबर २०२० पर्यंत दंड आकारला जाणार नाही...
करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेकांच्या वेतनावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. म्हणून ऑटो डेबिट त्या खातेधारकांसाठी त्रासदायक ठरू शकेल असे सांगितलं जात आहे. तसेच याशिवाय ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ज्या खातेधारकांच्या निवृत्तीवेतन योजनेचे खाते नियमित केले गेले नसतील तरी त्यांच्याकडून दंड आकारला जाणार नसल्याचेही सांगण्यात आलं आहे.

असा दंड आकारला जावू शकतो...
सध्या तरी कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. परंतु काहीवेळेस बॅंकेत सर्वसाधारणपणे उशीरा रक्कम जमा करण्यासाठी नेहमी दंड आकारला जातो आहे. दरमहा १०० रुपयांच्या योगदानावर दरमहा एक रुपयांचा दंड आकारला जातो. तसेच दरमहा १०१ ते ५०० रुपयांच्या योगदानावर प्रतिमहिना दोन रुपयांचा दंड आकारण्यात येतो. तर दरमहा ५०१ ते १००० रुपयांच्या योगदानावर पाच रुपये दंड भरावा लागतो. याशिवाय १००१ रुपयांपेक्षा जास्त योगदान दिल्यास १० रुपये दंड आकारला जातो. म्हणजेच रुपयांनुसार दंड आकारला जातो

यांच्यासाठी आहे अटल पेंशन योजना
अटल पेंशन योजनेचा लाभ कोणीही भारतीय नागरिक घेऊ शकतो. १८ ते ४० वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ  शकतात. अटल पेंशन योजनेत सहभागी होण्यासाठी त्या खातेधारकांचे बॅंकेत खाते असने महत्त्वाचे आहे. तसेच खातेधारक हा आधारकार्डसोबत लिंक असणे गरजेचे आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be some new changes in Atal Pension Scheme from 1st July