देशातील हि आहेत सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्ये; कोणती ते वाचा?

Corona-India
Corona-India

नवी दिल्ली - केंद्र आणि राज्य सरकारांचे शर्थीचे प्रयत्न आणि वाढवलेला लॉकडाउनचा काळ असे असूनही देशभरात कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. सरकारी आकडे गृहीत धरले तरी रुग्णसंख्या ३७ हजारांच्यावर गेली आहे . बरे होणाऱ्यांचा आकडा १० हजाराच्या घरामध्ये गेला आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये २,२९३ नवी कोरूना रुग्ण आढळले असून ही लॉकडाउन सुरू झाल्यापासूनची विक्रमी संख्या आहे. देशात बरे झालेले रुग्णही वाढत असून त्यांची संख्या ९९५१ झाली आहे.

सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्ये
महाराष्ट्र -
 चाचण्या आणि रुग्णसंख्या यात सुरवातीपासूनच पुढे असलेल्या महाराष्ट्रात जवळपास चौदा हजार कोरोनाग्रस्त आहेत. कोरोना बळींचा आकडाही पाचशेच्या जवळ गेला आहे.

दिल्ली - मरकजमधील कार्यक्रमाचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये दिल्लीचाही समावेश आहे. राजधानीतील कोरोनाग्रस्तांची संख्या पाच हजारवर पोहोचली असून ६१ जणांनी प्राण गमावले आहेत. काल एकाच दिवसात एकाच इमारतीतील तब्बल ४१ लोक कोरोनाग्रत आढळल्यावर या भागात खळबळ उडाली आहे. 

मध्य प्रदेश - इंदूरपासून सुरु झालेल्या कोरोनाच्या साथीने भोपाळसह अनेक शहरांना विळखा घातला आहे. राज्यात सध्या ३३८८ कोरोनाग्रस्त असून १४५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ५२४ बरे झाले आहेत.

गुजरात - त्यानंतर सर्वांत जास्त प्रमाणात कोरोना प्रभावित राज्यांमध्ये समावेश झालेल्या गुजरातमधील रुग्णसंख्या ५६९२ व मृतांचा आकडा २३६ वर पोहोचला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तमिळनाडू - तबलिगी प्रकरणानंतर कोरोनाची साथ वाढलेल्या तमिळनाडूमध्ये ३८६६ रुग्ण असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे. 
उत्तर प्रदेश : गृहमंत्रालयाच्या ताज्या यादीत सर्वाधिक म्हणजे १९ जिल्हे रेड झोनमध्ये असलेल्या उत्तर प्रदेशात संख्या थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात सध्या ३,०२४ रुग्णांपैकी सव्वादोन हजार रुग्ण सक्रिय आहेत. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा म्हणजेच गौतमबुद्धनगर जिल्ह्यात जास्त प्रकोप असलेल्या कोरोनाने आता आपला मोर्चा पूर्व-उत्तर प्रदेशाकडे वळवला आहे.

राजस्थान - कोरोनामुक्तीचे भीलवाडा मॉडेल देशासमोर ठेवणाऱ्या राजस्थानमध्ये ३,८४४ कोरोनाग्रस्त आहेत.  ६२ लोकांनी प्राण गमावले असून १११६ रुग्ण बरे झाले आहेत.

पश्चिम बंगाल - पश्चिम बंगालमध्ये ९६७ संक्रमित रुग्ण असून ३३ जणांचा जीव गेला आहे. १३९ रुग्ण बरे झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com