
हा पक्षी कोणता?
हा पक्षी म्हणजे 'हरियाल'. तो कबुतरासारखा दिसतो. त्याला पक्षाला हिरवे कबूतर म्हटले जाते. हरियाल पक्ष्याचा रंग हलका राखाडी असतो. तसेच त्यात पिवळे पट्टे असतात. त्याचे वय २६ वर्ष असून तो ३ सेंटीमिटर लांब असतो. हा पक्षी आळशी, सुस्त असतो त्यामुळे त्याचे पूर्ण आयुष्य आळसात झाडावरच घालवतो. नर-मादी एकसारखे दिसतात. पण नरापेक्षा मादी जास्त सुस्त असते. हा पक्षी भारतीय उपखंडात आढळतो. त्याच्या रंगामुळे त्याला हरियाल पक्षी असे नाव मिळाले आहे. भारतातील वाळवंट सोडून तो सगळीकडे आढळतो तर, भारताबाहेर श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बर्मा आणि चीन या देशांमध्ये आढळतो.
असा आहे आहार
हरियाल पक्षी गवताची पाने, पेंढ्याने पिंपळ, वड यांसारख्या उंच झाडांवर घरटे बनवतो. त्याला पाने, फळे, फुलांच्या कळ्या, बिया, धान्ये आणि रोपांची छोटी कोंब खायला आवडतात. हा पक्षी पिकलेली फळे आवडीने खातो. त्याला मनुका, जामून ही फळेही आवडतात. हरियाल पक्ष्याची चोच मोठी आणि मजबूत असते. झाडांच्या फळ आणि पानांवर जमलेल्या दवबिंदूतून भागते. हा पक्षी खूप लाजाळू आहे. त्यामुळे माणसांना पाहून तो गप्प बसतो. महत्वाच म्हणजे हरियाल पक्ष्याच्या सर्व गरजा झाडांमुळे पूर्ण होतात. त्यामुळेच हा पक्षी जमिनीवर पाय ठेवत नाही.
ग्रुपमध्ये राहणे आवडते
हरियाल पक्षी ट्रेरेन हा फॉनिकोप्टेरा प्रजातीचा असून तो महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. त्याचे मांस मऊ असते. त्यामुळे त्याची शिकार खूप केली जाते. तसेच त्याचा आवाज खूप गोड असून त्याला नेहमी ग्रुपमध्ये राहायला आवडते. एका पक्ष्यांच्या गटात ५ ते १० पक्षी असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.