esakal | 17 राज्यात कोरोनाची लस फ्री; पाहा संपूर्ण यादी

बोलून बातमी शोधा

17 राज्यात कोरोनाची लस फ्री; पाहा संपूर्ण यादी

कोविशील्डची खासगी रुग्णालयातील किंमत 600 रुपये असेल तर कोव्हॅक्सिन 1200 रुपयांना मिळणार आहे. एक मे रोजी लसीकरणाला सुरुवात होणार असून 17 राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

17 राज्यात कोरोनाची लस फ्री; पाहा संपूर्ण यादी
sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोना महामारीनं देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी भारतामध्ये सर्वात मोठी लसीकरण मोहिम एक मे पासून व्यापक करण्यात येत आहे. एक मे पासून देशात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. याआधी दोन टप्प्यात लसीकरण मोहिम झाली. 16 जानेवारी 2021 रोजी पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्याना लशीचे डोस देण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात (एक मार्च आणि एक एप्रिल) 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. भारतामध्ये सध्या तीन लसी दिल्या जात आहे. यामध्ये सीरम इन्सिट्युटची 'कोविशील्ड' तर भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सीन'चा समावेश आहे. याशिवाय रशीयाची 'स्पूतनिक' ही लसही उपलब्ध आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड लस राज्य सरकाच्या रुग्णालयात 400 रुपये प्रति डोस किंमतीमध्ये उपलब्ध असणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनची किंमत 600 रुपये असणार आहे. कोविशील्डची खासगी रुग्णालयातील किंमत 600 रुपये असेल तर कोव्हॅक्सिन 1200 रुपयांना मिळणार आहे. एक मे रोजी लसीकरणाला सुरुवात होणार असून 17 राज्यांनी मोफत लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: लस घ्यायला जाताय? जाणून घ्या प्रति डोस किंमत

एक मे पासून खालील राज्यात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार आहे....

 • मध्य प्रदेश

 • जम्मू

 • काश्मीर

 • हिमाचल प्रदेश

 • गोवा

 • केरळ

 • छत्तीसगढ

 • बिहार

 • झारखंड

 • उत्तर प्रदेश

 • आसाम

 • सिक्कीम

 • पश्चिम बंगाल

 • तामिळनाडू

 • आंध्रप्रदेश

 • तेलंगना

 • हरियाणा

भारतात आतापर्यंत (99 दिवसांमध्ये) 14 कोटीहून अधिक लशीचे डोस देण्यात आले आहेत. सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या कोविड 19 लसीकरण केंद्रावर लस मोफत देण्यात येईल. तर खासगी रुग्णालयात पारदर्शकपणे लशीसाठी सेल्फ सेट कॉस्टची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरण मोहिमेत लस घेण्यासाठी CoWIN अॅपमध्ये रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे.

हेही वाचा: "कोविशिल्डची किंमत माफकच"; लस महाग असल्याच्या चर्चांवर 'सीरम'चं स्पष्टीकरण