मुख्यमंत्री बनविण्यासाठी माझ्याकडे मागितले 2500 कोटी; भाजप आमदाराचा खळबळजनक दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MLA Basangouda Yatnal-Patil

फोडाफोडीचं राजकारण करत भाजपनं कर्नाटकमध्ये हातून गेलेली सत्ता परत आणलीय.

मुख्यमंत्री बनविण्यासाठी माझ्याकडे मागितले 2500 कोटी; भाजप आमदाराचा दावा

बंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटक (Karnataka) राज्यात नव्या राजकीय वादाला सुरुवात झालीय. फोडाफोडीचं राजकारण करत भाजपनं कर्नाटकमध्ये हातून गेलेली सत्ता परत आणली. मात्र, या काळात झालेलं राजकारण आता समोर आलं असून मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याकडं 2500 कोटींची मागणी केल्याचा दावा भाजप आमदारानं केलाय. त्यामुळं राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलंय.

मुख्यमंत्री व्हायचं असेल, तर 2500 कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आपल्याकडं करण्यात आली असल्याचा खळबळजनक दावा कर्नाटकातील भाजप आमदार बसनगौडा यत्नाळ-पाटील (विजापूर, माजी केंद्रीय मंत्री) यांनी केलाय. यत्नाळ यांच्या या दाव्यानंतर, आता कर्नाटकात एक नवाच राजकीय वाद सुरू झालाय. यावर काँग्रेसनंही प्रतिक्रिया दिलीय. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी केलीय.

हेही वाचा: चक्क संसदेसमोरच चड्ड्या वाळत घालत आंदोलन, सरकारची मोठी फजिती

भाजप नेते बसनगौडा यत्नाळ (BJP MLA Basangouda Yatnal-Patil) पुढं म्हणाले, राज्यातील काही दलालांनी आपल्याकडं मुख्यमंत्री होण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. 2500 कोटी रुपये दिल्यास आपल्याला मुख्यमंत्री करण्यात येईल, असं मला सांगण्यात आलं होतं. मात्र राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा चोरांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन देखील यत्नाळ यांनी केलंय. असे लबाड लोक तुमच्यापर्यंत पोहोचताच सोनिया गांधी (Sonia Gandhi) अथवा जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घ्या, असंही ते म्हणाले.

Web Title: They Asked Me For Rs 2500 Crore To Become The Chief Minister Of Karnataka Basangouda Yatnal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top