चक्क संसदेसमोरच चड्ड्या वाळत घालत आंदोलन, सरकारची मोठी फजिती I Sri Lanka | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International No Underpants Day 2022

श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडला आहे.

चक्क संसदेसमोरच चड्ड्या वाळत घालत आंदोलन, सरकारची मोठी फजिती

श्रीलंका सध्या आर्थिक संकटात (Economic Crisis in Sri Lanka) सापडला आहे. अवघ्या 2.2 कोटी लोकसंख्येचा हा देश आता दशकातील सर्वांत वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अन्न, गॅस आणि पेट्रोलियमच्या किंमती गगनाला भिडल्या असून महागाईचा दर काही महिन्यांपासून दुहेरी आकडा गाठत आहे. त्यातच आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धानं देशाला दूरवर फेकलंय.

वीजपुरवठा खंडित होणं, रिकामे एटीएम आणि पेट्रोल पंपावरील लांबच लांब रांगा.. हे श्रीलंकेत नेहमीचं दृश्य झालंय. श्रीलंका पेट्रोलियम गॅसपासून साखरेपर्यंत जवळजवळ सर्वच वस्तू आयात करतो. आता ही सगळी प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. त्यामुळे देशात प्रचंड महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

हेही वाचा: शाळेत विद्यार्थ्यांना मुस्लिम टोपी घालण्याचे आदेश, मुख्याध्यापिकेविरुध्द गुन्हा

आर्थिक संकटाचा सामना करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या श्रीलंकेत एप्रिल महिन्यापासून सतत मोर्चे होत आहेत. श्रीलंकेत सत्तारुढ असलेल्या सरकारमुळं देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचा आरोप करत शेकडो नागरिक रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढत आहेत. एप्रिल महिन्यापासून हा विरोध सुरूय. राजपक्षे यांना त्वरित सरकार बरखास्त करण्यासाठी दबाव आणला जात आहे. यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जात असून या दरम्यान मोर्चेकऱ्यांनी जगभरातील माध्यमांचं लक्ष वेधून घेण्यासाठी एक विलक्षण कृती केलीय.

हेही वाचा: कोलकात्यात भाजप कार्यकर्त्याची संशयास्पद हत्या, अमित शहांची CBI चौकशीची मागणी

एप्रिल महिन्यातील 6 तारखेला श्रीलंकेतील अनेक मोर्चेकरी आणि आंदोलनकर्त्यांनी श्रीलंकेच्या संसदेसमोर (Parliament) चड्ड्या वाळत घालून विरोध दर्शवला. 6 एप्रिल रोजी असणारा जागतिक विनाअंतर्वस्त्र दिवस श्रीलंकेत वेगळ्या प्रकारे साजरा केला गेला. या विरोधाला त्यांनी नो अंडरपँट्स प्रोटेस्ट (International No Underpants Day 2022) असं नाव दिलंय.

Web Title: Sri Lanka Economic Crisis Violent Protest With Unique Ideas No Underpants Day 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sri Lanka
go to top