

Thief Gets Stuck While Attempting Robbery In Kota Viral Video
Esakal
चोरी करण्यासाठी चोरट्यांकडून वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात. त्यांची चोरी करण्याची पद्धत पाहून अनेकदा अवाक् व्हायला होतं. मात्र राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात चोरीच्या प्रयत्नात चोरट्याची फजिती झाली. प्रतापनगर भागात एका घरात चोरी करण्यासाठी चोर गेला होता. त्यावेळी घरात घुसण्यासाठी त्यानं किचनला लावलेल्या एक्झॉस्ट फॅनच्या जागेतून जायचा मार्ग निवडला. पण त्यात अडकल्यानं त्याचा चोरीचा प्रयत्न फसलाच पण तो घर मालकाच्या ताब्यात सापडला. शेवटी सुटका करण्यासाठी त्यालाच विनवणी करण्याची वेळ आली.