
2024 वर्ष संपत आलं असून नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जग सज्ज झालंय. नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी केली जात आहे. दरम्यान, नव वर्षाच्या पूर्वसंध्येला सेलिब्रेशन करताना काही दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेतली जात आहे. काही ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत तर काही शहरात वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आलेत. पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.