
पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून मतदारयाद्यांचा फेरआढावा घेण्यावरून निवडणूक आयोगाला विरोधी पक्षाच्या आरोपाचा सामना करावा लागत असताना आज मतदारयादीचा पहिला मसुदा जारी करण्यात आला. यात राज्यातील ३५ लाख मतदार बेपत्ता किंवा स्थलांतरित असल्याचे आयोगाने म्हटले आहे. यात राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघातील ९०८१७ मतदान केंद्रांच्या माहितीचा समावेश आहे. येत्या एक सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत.