देशांतर्गत हिंसाचारामुळे निर्वासित झालेल्यांचे असे होत आहेत हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

refugees

देशांतर्गत हिंसाचारामुळे निर्वासित झालेल्यांचे असे होत आहेत हाल

मुंबई : निर्वासितांची समस्या ही जागतिक समस्या आहे. जे लोक युद्ध, हिंसाचार आणि इतर गोष्टींपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून इतर देशांमध्ये जातात त्यांचा समावेश निर्वासितांच्या श्रेणीत केला जातो. जगभरात असे लाखो निर्वासित आहेत.

हेही वाचा: ४३ वर्षांची महिला बनली ४४ मुलांची जन्मदात्री; पतीने घाबरून सोडलं घर

दुसऱ्या देशात जाणाऱ्या निर्वासितांना तेथील नागरिकत्व आणि सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे बरेच हाल होतात. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार २०२० पर्यंत ८ कोटी २४ लाख जणांना निर्वासित व्हावे लागले.

हेही वाचा: एनडीएच्या पहिल्या महिला तुकडीत शानन ढाका सर्वोच्च स्थानी

८३ टक्के निर्वासितांनी विकसनशील देशांमध्ये आश्रय घेतला आहे. त्यापैकी ४० टक्क्यांहून अधिक लहान मुले आहेत. जगातील एकूण निर्वासितांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश पेक्षा जास्त निर्वासित सीरिया, व्हेनेझुएला, दक्षिण सुदान, अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांतून आलेले आहेत.

३ ते ६ दशलक्षाहून अधिक शरणार्थी छावण्यांमध्ये राहतात जेथे सर्व गरजूंना त्वरित संरक्षण आणि मदत दिली जाते. हे असे लोक आहेत ज्यांना छळ, युद्ध किंवा हिंसाचारामुळे घर सोडून पळून जावे लागले आहे. जगातील सर्वात मोठ्या निर्वासित शिबिरांपैकी एक दादाब, केनिया येथे आहे जिथे ३ लाख २९ हजारांपेक्षा जास्त लोक राहतात.

जगभरात २० जून हा world refugee day म्हणून साजरा केला जातो. जागतिक निर्वासित दिन २००१ मध्ये जगात पहिल्यांदा अस्तित्वात आला जेव्हा हा दिवस १९५१ च्या UN निर्वासित कराराचा ५० वा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात आला. पूर्वी हा दिवस आफ्रिका निर्वासित दिन म्हणून ओळखला जात असे. सन २००० मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी अधिकृतपणे जागतिक निर्वासित दिन म्हणून मान्यता दिली.

Web Title: This Is What Is Happening To Those Who Have Been Displaced By Domestic Violence Refugees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..