काँग्रेस नेता भाजपला म्हणाला, रावणाची औलाद

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन होत आहे. मात्र, कोठेही हिंसाचार झालेला नाही. पण, भाजपचे काही लोक महात्मा गांधींविषयी बोलत आहेत. महात्मा गांधी हे श्रीरामाचे पुजारी होते आणि त्यांचा अपमान भाजपचे नेते करत आहेत. हे भाजपचे नेते रावणाची औलाद आहेत. 

नवी दिल्ली : भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींवर केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांनी भाजपची रावणाची औलाद म्हणून तुलना केली. लोकसभेच्या कामकाजातून हे वगळण्यात आले असले तर भाजपकडूनही काँग्रेसला लक्ष्य करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचे काहीच योगदान नव्हते, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केल्यानंतर देशभर संताप व्यक्त करण्यात आला होता. भाजपनेही या वक्तव्याशी संबंध न जोडता वैयक्तिक मत असल्याचे म्हटले होते. आज (मंगळवार) संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी यांनी भाजपला लक्ष्य करत आक्षेपार्ह टीका केली आहे.

चौधरी म्हणाले, की देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन होत आहे. मात्र, कोठेही हिंसाचार झालेला नाही. पण, भाजपचे काही लोक महात्मा गांधींविषयी बोलत आहेत. महात्मा गांधी हे श्रीरामाचे पुजारी होते आणि त्यांचा अपमान भाजपचे नेते करत आहेत. हे भाजपचे नेते रावणाची औलाद आहेत. 

चौधरी यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेत जोरदार गोंधळ झाला. भाजप खासदारांनी आक्षेप घेतल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाजातून हे वक्तव्य हटविले. यानंतर भाजप खासदारांनी सोनिया गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those insulting Mahatma Gandhi are children of Ravan says Adhir Ranjan Chowdhury