गांधी जयंतीला 'गोडसे जिंदाबाद' टि्वट करणाऱ्यांना वरुण गांधींनी सुनावलं | Gandhi Jayanti | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varun Gandhi

गांधी जयंतीला 'गोडसे जिंदाबाद' टि्वट करणाऱ्यांना वरुण गांधींनी सुनावलं

नवी दिल्ली: गांधी जयंतीच्या (Gandhi Jayanti) दिनी गोडसे जिंदाबाद (Godse zindabad) टि्वट करणाऱ्यांना भाजपा (bjp) नेते वरुण गांधी (varun gandhi) यांनी सुनावलं आहे. गोडसे जिंदाबाद टि्वट करणारे असं "बेजबाबदारपणे वागून देशाचं नाव खराब करत आहेत" असं वरुण गांधी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५२ वी जयंती आहे. त्या निमित्ताने टि्वटरवर आज महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं कौतुक सुरु होतं. अशा प्रकारे नथुरामचं कौतुक करणाऱ्यांवर वरुण गांधी यांनी टीका केली आहे.

३० जानेवारी १९४८ रोजी नुथराम गोडसेने गोळी झाडून महात्मा गांधींची हत्या केली होती. आश्चर्यकारकरित्या आज 'नथुराम गोडसे जिंदाबाद' टि्वटरवर ट्रेंडिंगमध्ये होतं. ६४ हजारपेक्षा जास्त लोकांनी यावर टि्वट केलं. अनेकांनी या ट्रेंडवर सडकून टीकाही केली. वरुण गांधी यांनी ट्रेंडिंगमधला हॅशटॅग वापरला नाही, तरीही २५०० जणांनी त्यांचे टि्वट रिट्वट केले. दुपारी १.३० पर्यंत या टि्वटला १० हजार लाईक्स होते.

२ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातच्या पोरबंदर शहरात महात्मा गांधींचा जन्म झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास केला व दक्षिण आफ्रिकेत अनेक वर्ष वास्तव्य केले. भारतात परतल्यानंतर महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय झाले.

टॅग्स :varun gandhi