esakal | मुलीच्या आईस्क्रीमसाठी त्याने लोअर परेल ब्रिजवर अचानक गाडी वळवली आणि... | Lower parel accident
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीच्या आईस्क्रीमसाठी त्याने लोअर परेल ब्रिजवर अचानक गाडी वळवली आणि...

मुलीच्या आईस्क्रीमसाठी त्याने लोअर परेल ब्रिजवर अचानक गाडी वळवली आणि...

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या लोअर परळ ब्रिजवरील (Lower parel bridge) एका अपघाताचा (Accident) व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. ब्रिजवर घेतलेल्या अचानक 'यू टर्न' मुळे मागून वेगात येणाऱ्या दुचाकीस्वाराचे (biker) गाडीवरील (car) नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी चालक अमित कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. अचानक घेतलल्या या यू टर्न मागचे कारण जेव्हा पोलिसांनी त्याला विचारले. त्यावेळी मुलीला आईस्क्रीम हवे असल्याने गाडी ब्रिजवर अचानक फिरवल्याचे त्याने सांगितले.मुंबईच्या लोअर परळ परिसरात राहणारा अमित कुमार हा एका नामकिंत क्लबमध्ये पीसीआर मॅनेजर म्हणून काम करतो. २९ सप्टेंबरला रात्री अमित हा दादरच्या दिशेने कारने वेगात जात होता. अचानक त्याच्या पत्नीचा फोन आला आणि मुलीला आईस्क्रीम खायचं असल्याचं तिनं अमितला सांगितलं. लाडक्या मुलीचे लाड पुरवण्याच्या नादात अमितने पुढचा-मागचा विचार न करता, आयस्क्रिम पार्लर मध्ये जाण्यासाठी गाडी अचानक वळवली.

याच वेळी मागून वेगात येत असलेल्या दुचाकीस्वार भावेशने ते पाहिलं. मात्र गाडीचा वेग पाहता, गाडीवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि भावेशच्या बाईकने अमितच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, भावेश कारला धडकल्यानंतर रस्त्याच्या दुसऱ्याबाजूला फेकला गेला आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वाराच्या गाडीखाली आला.

हेही वाचा: UP धर्मांतर प्रकरण: यवतमाळच्या तरुणाला कानपूरमध्ये अटक

मात्र हा अपघात पाहताच, घाबरलेल्या अमितने तेथून पळ काढला. अपघाताचा हा संपूर्ण थरार ब्रिजवरील सीसीटिव्हीत कैद झाला आहे. या अपघातानंतर दोन्ही दुचाकीस्वारांना तातडीने सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी भावेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा: रसिका सुनीलचा होणारा पती आहे तरी कोण?

मात्र दुसरीकडे या प्रकरणी ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत सीसीटिव्हीच्या मदतीने चालकाची ओळख पटवण्यासाठी गाडीच्या नंबरहून तिचा शोध सुरू केला. त्यावेळी गाडी लोअरपरळच्या एका सोसायटीबाहेर दिसली. पोलिसांनी चौकशीअंती अमितल ताब्यात घेतले. चौकशीत अमितनेही गुन्ह्याची कबूली दिली.

मात्र अचानक ब्रिजवर यू टर्न मारण्यामागचं कारण त्याला जेव्हा विचारण्यात आलं. त्यावेळी त्याने मुलीला आईस्क्रीम हवे असल्याचा पत्नीचा फोन आला होता. कोरोनामुळे दिलेल्या वेळेत दुकानदार दुकानं बंद करतात. जर तसं झालं तर आयस्क्रिम मिळणार नाही. त्यामुळेच जागेवरच यू टर्न मारल्याची कबूली अमितने पोलिसांना दिली. न्यायालयाने अमितला १५ हजाराच्या जामीनावर मुक्त केलं आहे.

loading image
go to top