
बंगळुरु : जे 'हवाई चप्पल' वापरतात त्यांनी 'हवाई जहाज' मधून प्रवास करायला हवा, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सोमवारी कर्नाटकतील शिवमोगा जिल्ह्यातील शिवमोगा एअरपोर्टचं उद्घाटन केलं.
यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते. भारतातील एव्हिएशन मार्केट वेगानं वाढत असल्याचंही यावेळी त्यांनी म्हटलं. (Those wearing hawai chappals should travel in hawai jahaz says PM Modi)
मोदी म्हणाले, येत्या काळात भारताला हजारो विमानांची गरज पडेल तसेच 'मेड इन इंडिया' पॅसेंजर विमानांचे दिवस येणं आता फार दूर नाही.
यावेळी मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. म्हणाले, २०१४ पूर्वी एअर इंडिया ही निगेटिव्ह कारणांसाठी चर्चेत होती. तसेच ही कंपनी घोटाळ्यांसाठीच चर्चेत होती.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील भाजपचे स्ट्राँगमॅन बी. एस. येडियुरप्पा यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त नव्या शिवमोगा विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी येडियुरप्पांना सदिच्छा देण्यासाठी मोदींनी उपस्थितांना आपल्या मोबाईलचे फ्लॅश सुरु करण्यास सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.