
Ramdev on Stampede Marathi News : प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ९० जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवर योगगुरु बाबा रामदेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार आणि प्रशासनाचं काम चोख होतं पण लोकांनाच शिस्त नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. रामदेव यांच्या या विधानावर आता उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत.