CM योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी! पोलीस कंट्रोल रूमला फोन अन्...

Threat to CM Yogi Adityanath: लखनऊच्या पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलने खळबळ उडाली. कारण, या कॉलमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी क्रमांकावर हा कॉल आला.
Threat to CM Yogi Adityanath
Threat to CM Yogi AdityanathEsakal

Threat to CM Yogi Adityanath: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या पोलीस नियंत्रण कक्षात आलेल्या एका कॉलने खळबळ उडवून दिली. कारण, या कॉलमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी क्रमांकावर हा कॉल आला. त्यानंतर नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने धमकीच्या नंबरची तक्रार दाखल केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.(Threat to CM Yogi Adityanath)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गेल्या रविवारी मध्य विभागातील महानगर कोतवाली येथील सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीयूजी नंबरवर धमकीचा कॉल आला होता, जो हेड कॉन्स्टेबलने घेतला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवले जाईल, असे कॉलरने कॉन्स्टेबलला सांगितले. कॉन्स्टेबलने विचारले असता तुम्ही कुठून बोलत आहात? तेव्हा कॉलरने लगेचच कॉल डिस्कनेक्ट केला.

Threat to CM Yogi Adityanath
Karnataka Issues Health Advisory: उष्णतेची लाट! बेंगळुरूमध्ये पाणीटंचाई; पाण्याच्या टँकरच्या दरात दुपटीने वाढ, सरकारने जारी केली ॲडव्हायझरी

पोलीसांकडून तपास सुरू

कॉन्स्टेबलने तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या फोनची माहिती दिली, त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सध्या सुरक्षा मुख्यालयात तैनात असलेल्या मुख्य हवालदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात करण्यात आली आहेत. सव्र्हेलन्स सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. सीएम योगी यांना यापूर्वीही धमक्या आल्या आहेत.

Threat to CM Yogi Adityanath
Arvind Kejriwal: 8 समन्सनंतर केजरीवाल पहिल्यांदाच नमले! ईडीला उत्तर देण्यास तयार, दिली तारीख

चीफ कॉन्स्टेबल उधम सिंग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री १०.०८ वाजता त्यांच्या मोबाईलवर कॉल आला होता. फोन करणाऱ्याने सीएम योगींना बॉम्बने उडवले जाईल असे सांगितले. उधम सिंह यांनी फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने फोन कट केला. त्यानंतर उधम सिंह यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

Threat to CM Yogi Adityanath
Mukesh and Nita Ambani Video Viral: Yes Boss! मुकेश अंबानींसुद्धा 'या' डॉनला घाबरतात? स्वतःच सांगितलं, समोर आला व्हिडिओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com