‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र; डॉ. अजित नवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 डॉ. अजित नवले
‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र; डॉ. अजित नवले

‘अन्न गुलामगिरी’ लादण्याचे षड्‌यंत्र; डॉ. अजित नवले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तीन कृषी कायदे म्हणजे ‘अन्न गुलामगिरी लादण्याचे षड्‌यंत्र’ होते. मोदी यांच्याकडून कायदे मागे घेण्यात आल्याच्या घोषणेने आंदोलकांमध्ये समाधान निश्‍चित आहे. मात्र आंदोलन अजून संपलेले नाही.

- डॉ. अजित नवले

हेही वाचा: बापरे! भारत-पाक सामना एवढ्या लोकांनी पाहिला; Viewership चा नवा विक्रम

संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमांवर केंद्र सरकारविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला २६ नोव्हेंबर २०२१ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. शेतकरी विरोधी, कॉर्पोरेट धार्जिणे तीन कृषी कायदे रद्द करा, दीडपट हमीभावाचा केंद्रीय कायदा करा व केंद्रीय वीज विधेयक मागे घ्या या प्रमुख मागण्यांसाठी ५०० पेक्षा जास्त संघटनांनी संपूर्ण वर्षभर दिलेला लढा शेतकरी आंदोलनाच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व असाच आहे.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

...रोखण्यासाठी सर्वकाही

हा लढा मोडून काढण्यासाठी मोदी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. सीमांपर्यंत शेतकरी पोहोचू नयेत यासाठी रस्त्यांमध्ये खंदकांसह अनेक अडथळे टाकण्यात आले, बॅरिकेट्स उभारण्यात आले. अत्यंत कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे वेगवान फवारे मारण्यात आले. आंदोलक हे खलिस्तानवादी, नक्षलवादी, पाकिस्तानी असून चीनची फूस आहे अशाप्रकारे जोरदार अपप्रचार आणि बदनामी करण्यात आली. संयुक्त किसान मोर्चाने या सर्व आक्रमणांना संयम, शांतता व लोकशाही मूल्यांच्या बळावर यशस्वीरीत्या परतवून लावले.

loading image
go to top