हिज्बुल मुजाहिदीनच्या 3 दहशतवाद्यांचा बडगाममध्ये खात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जुलै 2017

मारण्यात आलेले दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते.

श्रीनगर : मध्य काश्मीरमधील बडगाम येथे मंगळवारी रात्री भारतीय फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एक दिवसानंतरच ही चकमक झाली.

बडगाम येथील रेडबग भागात दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर भारतीय जवानांनी मंगळवारी रात्री या भागाला वेढा देऊन शोध मोहिम सुरू केली. मारण्यात आलेले दहशतवादी हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचे सदस्य होते. बडगाम भागामध्ये आणखी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली असून, त्या दहशतवाद्यांचा शोध अद्याप सुरू आहे. 

रात्रभर सुरू असलेली ही चकमक आज (बुधवार) सकाळी यशस्वीरीत्या संपली. तत्पूर्वी, अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांवर श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सहाजण मृत्युमुखी पडले होते, तर एकूण 19 लोक जखमी झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three hizbul mujahideen terrorists gunned down in budgaum