Bomb Threat: बेंगळुरुमधील नामांकित 3 हॉटेल्स हाय अलर्टवर; बॉम्बने उडवून देण्याची मिळाली धमकी

bomb threats via email: नामांकित ओटेरा हॉटेलला देखील धमकीचा ईमेल मिळाला आहे. धमकी मिळाल्याची माहिती हॉटेल्सनी पोलिसांना दिली.
bomb threats
bomb threats
Updated on: 

नवी दिल्ली- बेंगळुरुमधील तीन हॉटेल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. टीव्ही रिपोर्टनुसार, ईमेल द्वारे ही धमकी मिळाली आहे. त्यानंतर शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. पोलीस, बॉम्ब स्कॉड आणि स्निफर डॉग हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

नामांकित ओटेरा हॉटेलला देखील धमकीचा ईमेल मिळाला आहे. धमकी मिळाल्याची माहिती हॉटेल्सनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सध्या पोलीस आणि बॉम्ब स्कॉड हॉटेलमध्ये आहेत. शोध सुरु आहे. याप्रकरणी अधिक इनपूट मिळालेले नाहीत.

.

bomb threats
Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

काही आठवड्यांपूर्वी बेंगळुरुतील प्रायव्हेट स्कूल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. यांसदर्भात स्कूल प्रशासनाला ईमेल पाठवण्यात आला होता. यात दावा करण्यात आला होता की, 'डेस्क आणि बँचच्या खाली स्फोटके ठेवण्यात आली आहेत.' सदर धमकीने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरु केली होती. पण, मिळालेली धमकी खोटी असल्याचं समोर आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Karnataka Bus Ticket Fare Increase
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Nagpur School Bomb Threat
Nagpur School Bomb Threat
Marathi News Esakal
www.esakal.com