मेहबुबांच्या वक्तव्यामुळे तीन नेत्यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
Tuesday, 27 October 2020

राष्ट्रध्वजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. मेहबूबा यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या तीन नेत्यांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीनगर - राष्ट्रध्वजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. मेहबूबा यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या तीन नेत्यांनी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामध्ये ‘पीडीपी’चे नेते टी.एस. बाजवा, वेद महाजन आणि हुसैन.ए. वफा यांचा समावेश आहे. या सर्वच नेत्यांनी मेहबूबा यांच्याकडे नाराजी व्यक्त करत त्यांना पत्र देखील लिहिले आहे. मुफ्ती यांची काही वक्तव्ये आणि त्यांच्या कृती आमच्या राष्ट्रभावनांना ठेच पोचविणारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  दरम्यान मेहबूबा यांच्या वक्तव्याबाबत नॅशनल कॉन्फरन्सने देखील नाराजी व्यक्त केली असून त्यांच्या वक्तव्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही दिवसांपूर्वी मुफ्ती यांनी राष्ट्रध्वजाऐवजी आम्ही राज्याच्या ध्वजाला वंदन करू असे म्हटले होते. मेहबूबा मुफ्ती यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बाईक रॅली  काढली होती. यातील एक रॅली ही जम्मूमध्ये तर दुसरी श्रीनगरमध्ये काढण्यात आली होती, यामध्ये बुलेटप्रूफ गाड्यांसह मोठ्या संख्येने आपआपली वाहने घेऊन हे कार्यकर्ते सहभागी झाले होते, अशा माहिती सूत्रांनी दिली.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three leaders resign over Mehboobas statement