
मध्य प्रदेशमध्ये सपा-बसपाला भाजपचा झटका, तीन आमदारांनी केला पक्षात प्रवेश
भोपाळ : मध्य प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापायला लागले आहे. या स्थितीत भाजपमध्ये (BJP) मंगळवारी (ता.१४) तीन आमदारांनी प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे आमदार राजेशकुमार शुक्ला, बहुजन समाज पक्षाचे आमदार संजीवसिंह कुशवाहा आणि अपक्ष आमदार विक्रमसिंह राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. धतरपूरच्या बिजावरमधील सपाचे आमदार राजेश शुक्ला आणि भिंडचे बसप आमदार संजीव कुशवाहा यांनी आपल्या पक्षाचा साथ सोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केले. (Three MLAs Join BJP In Presence Of Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan)
हेही वाचा: हवा प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान घटले, मानवी आरोग्यासाठी धोका
कुशवाहा हे पूर्वी भाजपमध्येच होते. त्यांचे वडील रामलखन सिंह पाच वेळा खासदार राहिले आहेत. हे दोन्ही आमदार भाजपला बाहेरुन समर्थन देत होते. विशेषतः या तीन आमदारांवर पक्षांतर कायदा लागू होत नाही. कारण सपाचे केवळ एक आमदार राजेश शुक्ला हे भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचे १०० टक्के विलीन भाजपमध्ये झाले आहे. दुसरीकडे रामबाई आणि संजीव कुशवाहा यांच्या रुपाने बसपाजवळ दोन आमदार आहेत. या प्रमाणे ५० टक्के विलनीकरण भाजपमध्ये झाल्याने पक्षांतर कायदा लागू होत नाही.
हेही वाचा: BSP : रामपूर लोकसभा पोटनिवडणूक बसपा लढवणार नाही; मायावतींचा मोठा निर्णय
मध्य प्रदेशात जुलैमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या आमदारांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला तगडी टक्कर आणि भाजपला मोठे पाठबळ मिळणार आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) विधानसभेत २३० सदस्यांमध्ये १२७ भाजप सदस्य आहेत.
Web Title: Three Mlas Join Bjp In Presence Of Madhya Pradesh Cm Shivraj Singh Chouhan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..