CBI प्रमुखपदाच्या शर्यतीत सुबोध जैस्वालांसह तीन नावांची चर्चा

सुबोध कुमार जैस्वाल हे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक
CBI प्रमुखपदाच्या शर्यतीत सुबोध जैस्वालांसह तीन नावांची चर्चा

नवी दिल्ली: CBIचे नवे प्रमुख कोण असतील याबद्दलची चर्चा आता रंगू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय समितीच्या (Committee) चर्चेत तीन नावं शर्यतीत (Race) सर्वात पुढे असल्याची माहिती आहे. CBIच्या संचालक पदासाठी शसस्त्र सीमा बलचे (SSB) महासंचालक कुमार राजेश चंद्रा (Kumar Rajesh Chandra), गृह मंत्रीलयातील विशेष सचिव व्हि एस के कौमुदी (V S K Kaumudi) आणि CISF चे महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यां नावांची चर्चा आहे. जैस्वाल हे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक (Ex DGP) होते. ही नावे अंतिम यादीत कायम करणं फारसं सोपं नव्हतं, कारण मोदी यांच्या त्रिसदस्यीय समितीतील सदस्य असलेले काँग्रेसचे लोकसभा खासदार अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी या प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली होती. या समितीतील तिसरे सदस्य म्हणून भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा (CJI NV Ramana) यांचा समावेश करण्यात आला आहे. या तीन जणांच्या समितीने सध्या तीन जणांची नावं अंतिम केल्याची चर्चा आहे. (Three names shortlisted along with Subodh Kumar Jaiswal for CBI chief post)

CBI प्रमुखपदाच्या शर्यतीत सुबोध जैस्वालांसह तीन नावांची चर्चा
‘नियम मान्य’, केंद्राच्या डेडलाइनवर फेसबुकची प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, Department of Personnel and Training (DoPT) कडून ११ मे रोजी एकूण १०९ नावांची यादी या समितीकडे पाठवण्यात आली. त्यानंतर सोमवारी समितीकडे केवळ १६ नावं आणि त्या नावांसोबत त्यांचा मुद्देसूद तपशील पाठवण्यात आला. या प्रक्रियेवर अधिर रंजन चौधरी नाराज झाले. DoPT ने ९३ नावं स्वत:च वगळून केवळ १६ जणांचेच तपशील कसे काय पाठवले? यादीतून नावं वगळण्याचा अधिकार समितीच्या सदस्यांचा आहे अशा प्रकारची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे.

CBI प्रमुखपदाच्या शर्यतीत सुबोध जैस्वालांसह तीन नावांची चर्चा
Sachin Waze Case: मुंबई पोलीस दलातील चौथा कर्मचारी बडतर्फ

दरम्यान, चौधरी यांच्या नाराजीनंतरही सरकारने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही अशीही माहिती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या यादीत आनंद प्रकाश महेश्वरी, विजय कुमार सिंग, सोमेश गोयल, अरविंद कुमार, सामंत कुमार गोयल, राकेश अस्थाना, वाय सी मोदी, एस एस देशवाल, हितेश चंद्र अवस्थी, सुबोध कुमार जैस्वाल, कुमार राजेश चंद्रा, अरूण कुमार, लोकनाथ बेहेरा व्ही एस के कौमुदी आणि अभय यांची नावं होती. या यादीवर चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली होती. यातील पाच जण सेवानिवृत्त झाले आहेत. अशाप्रकारची यादी देऊन DoPT समितीला गृहित धरतंय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com