
Bangalore Crime : संपूर्ण राज्याला हादरा देणारी एका विद्यार्थिनीवर अत्याचाराची आणखी घटना घडली आहे. व्याख्यात्यांनीच महाविद्यालयीन एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी मंगळूर (दक्षिण कन्नड) जिल्ह्यातील मुडबिद्री येथील महाविद्यालयातील दोन व्याख्याते आणि त्यांच्या मित्राविरुद्ध बंगळूरमधील मारतहळ्ळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्यांची ओळख पटली आहे. महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे व्याख्याता नरेंद्र, जीवशास्त्राचे व्याख्याता संदीप आणि त्यांचा मित्र अनुप अशी संशयित आरोपींची नावे आहेत.