

Congress Former MP Family Accident
ESakal
इंदूरमधील रालामंडल बायपासवर झालेल्या एका दुर्दैवी रस्ते अपघाताने शहराला हादरवून टाकले आहे. माजी खासदार गृहमंत्री बाला बच्चन यांची मुलगी प्रेरणा बच्चन, काँग्रेस प्रवक्ते आनंद कासलीवाल यांचे पुत्र प्रखर कासलीवाल आणि त्यांचा मित्र मान सिमरन संधू यांचा या अपघातात मृत्यू झाला. या अपघातात एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.