राहुल गांधींचा हल्लाबोल, केंद्र सरकारला विचारले तीन प्रश्न

राहुल गांधींचा हल्लाबोल, केंद्र सरकारला विचारले तीन प्रश्न

Rahul Gandhi on Modi Government, Coronavirus, Black Fungus : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या कामकाजावर टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना संकट सुरु असतानाच आलेल्या Black fungus या महामारीवरुन केंद्र सरकारवर राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. जवळपास 26 राज्यात Black fungus महामारीनं हातपाय पसरले आहेत. 26 राज्यात 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. Black fungus महामारीला आटोक्यात आणण्यासाठी केंद्रानं काय तयारी केली? यावरुन राहुल गांधी यांनी मोदी सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत.

राहुल गांधी यांनी केंद्राला विचारलेले प्रश्न -

1. Amphotericin B औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी काय उपाययोजना सुरु आहेत?

2. रुग्णांना Amphotericin B हे औषध मिळण्याची प्रक्रिया काय आहे?

3. उपचार देण्याऐवजी मोदी सरकार जनतेला औपचारिकतेत का अडकवत आहे?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सत्ताधारी मोदी सरकाराला वांरवांर प्रश्न विचारत आहे. कोरोना महामारी आणि आता ब्लॅक फंगसवरुन मोदी सरकारवर निशाना साधला आहे.

पंतप्रधानांची नौटंकी, त्यांच्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट- राहुल गांधी

पहिल्या लाटेत काही समजलं नसेल जाऊ द्या, पण दुसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान जबाबदार आहेत, पंतप्रधानांनी नौटंकी केली. लसीकरण झालं नाही तर, तिसरी, चौथी लाट येईल, कारण विषाणू म्युटंट होईल. ज्या प्रकारे काम करत आहात, ते बंद करा, कारण लाखो लोक मरत आहेत. मृत्यूदर चुकीचा आहे. सरकार खोटं पसरवत आहे. जनतेला सत्य सांगा. मी राजकारण करत नाहीये, हा देशाचा भविष्याचा प्रश्न आहे. आम्ही शत्रू नाही, आम्ही मार्ग दाखवतो आहोत, आमचं ऐकलं असतं तर लाखो लोक मेले नसते, असं राहुल म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com