
तीन दहशतवाद्यांचा पुलवामामध्ये खातमा
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शनिवारी (ता. ११) रात्रभर चाललेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्करे तैय्यबाच्या तीन दहशतवाद्यांचा खातमा केला. या दहशतवाद्यांमध्ये रियाज अहमद या पोलिसाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. त्यामुळे, यावर्षी खोऱ्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या आता ९९ वर पोचली आहे.
पुलवामा जिल्ह्यातील द्राबगाम गावात दहशतवाद्यांविषयी सुरक्षा दलांना माहिती मिळाली होती. त्यानंतर, दलांनी शोधमोहिम हाती घेतली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी दहशतवाद्यांवर बेछूट गोळीबार करण्यास सुरवात केली. सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत लष्करे तैयबाच्या तीन स्थानिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.
सुरक्षा दले सुखरुप
पोलिस, सुरक्षा दलांवर हल्ले यासह नागरिकांवर अत्याचार करण्यातही दहशतवाद्यांचा सहभाग होता. सुरक्षा दलांनी स्वत:ची कसलीही जीवितहानी होऊ न देता ही मोहीम राबविल्याबद्दल काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी अभिनंदन केले.
Web Title: Three Terrorists Killed In Pulwama
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..