Panna Tiger Reserve : चारा आणण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला केला असून या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी मध्यप्रदेशच्या भोपाळमधील पन्ना व्याघ्र प्रकल्पात ही घटना घडली. फुलिया साहू असं या मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर आता गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे.