
सध्या अॅनाकोंडा आणि ब्लॅक पँथरच्या फायटिंगचा थरार असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसा हा व्हिडिओ खूपच जुना आहे. साधारण आठ वर्षांपूर्वीचा हा व्हिडओ पुन्हा एकदा शेअर केला जात आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ, फोटोज व्हायरल होत असतात. यात अनेकदा मजेशीर व्हिडिओ असतात तर कधी कधी दोन प्राण्यांमधलं भांडणही असतं. अशा व्हिडिओंना सोशल मीडियावर नेटकरीही भरभरून प्रतिसाद देत असतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हळव्या मनाचे लोक प्राण्यांमधील भांडण किंवा हिंसक व्हिडिओ पाहणं टाळतात. त्यांना असे व्हिडिओ पाहणं त्रासदायक वाटतं.
सध्या अॅनाकोंडा आणि ब्लॅक पँथरच्या फायटिंगचा थरार असलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाण्यात या दोघांचा एकमेकांशी सामना होत आहे. तसा हा व्हिडिओ खूपच जुनाह आहे. साधारण आठ वर्षांपूर्वीचा हा व्हिडओ पुन्हा एकदा शेअर केला जात आहे.
Registro raríssimo de uma onça-pintada lutando com uma sucuri. pic.twitter.com/bQPGu9Cutn
— Biodiversidade Brasileira (@BiodiversidadeB) January 5, 2021
ब्लॅक पँथर आणि अॅनाकोंडाच्या फायटिंगच्या व्हिडिओमध्ये ब्लॅक पँथर पाण्यात उभा असलेला दिसतो. 15 सेकंदाच्या व्हिडिओत शेवटी ब्लॅक पँथर अॅनाकोंडाला तोंडात पकडलेला दिसतो. ट्विटरवर या दोघांच्या फाइटचा व्हिडिओ शेअर केला जात आहे. आतापर्यंत जवळपास 80 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर 5 हजार लोकांना व्हिडिओवर कमेंट केली आहे. ब्लॅक पँथर आणि अॅनाकोंडा यांच्या फाइटचा दुर्मीळ व्हिडिओ असा कॅप्शन याला देण्यात आला आहे.