आमच्या लोकांना देशाबाहेर काढण्याची हिंमत नाही - नितीशकुमार

उज्वल कुमार
Friday, 6 November 2020

बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणुकीला दोन दिवस उरले असताना संयुक्त लोकशाही आघाडीतील (एनडीए) दोन पक्षांमधील बेबनाव सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) उघड झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी ‘घुसखोरांना देशाबाहेर हाकलले पाहिजे’, असे वक्तव्य केले होते.

पाटणा - बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निवडणुकीला दोन दिवस उरले असताना संयुक्त लोकशाही आघाडीतील (एनडीए) दोन पक्षांमधील बेबनाव सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन (सीएए) उघड झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी ‘घुसखोरांना देशाबाहेर हाकलले पाहिजे’, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेत ‘कोणामध्‍येही एवढी हिंमत नाही की, तो आमच्या लोकांना देशाबाहेर काढू शकेल, असा घणाघात नितीश कुमार यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किशनगंज येथे गुरुवारी प्रचार सभेत बोलताना नितीश कुमार यांनी योगींना लक्ष्य केले. भाषणातील काही अंशाचे व्हिडिओ चित्रण त्यांनी पोस्ट केले आहे. ‘‘हा अपप्रचार कोण करीत आहे. अशा फालतू गोष्टी कोण बोलत आहे. कोण कोणाला देशाबाहेर काढील? या देशात कोणाचीही हिंमत नाही आमच्या माणसांना बाहेर काढण्याची. सर्वजण हिंदुस्तानचे आहेत, भारताचे आहेत, त्यांना कोण हुसकावून लावणार आहे. तुम्ही संधी दिल्याने आम्ही समाजात एकोपा, प्रेम, सद्‍भावनेचे वातावरण तयार केले आहे. सर्वांचा एकजूट करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.  समाजात भांडणे लावून देण्याचा काहींचा हेतू असतो. काही काम करण्याची गरज नसल्याचे त्यांना वाटते. 

भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री असलेल्या काँग्रेस नेत्याला अटक

आम्ही तर काम करीत आलो आहोत. सर्वजण गुण्यागोविंदाने राहिले तर समाज, लोक पुढे जातील, त्यांची प्रगती होईल,’’ असे कुमार यांनी म्हटले आहे.  कटिहार विधानसभा मतदारसंघातील उमेदवाऱ्याच्या प्रचारसभेत योगी आदित्यनाथ यांनी ‘‘जर कोणी घुसखोर भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करीत असेल तर सरकार त्याला देशाबाहेर हाकलून लावेल,’’ असे वक्तव्य केले आहे.

बिहारी जनतेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 4 पानांचे विकास-पत्र

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar Election Nitishkmar comment on aadityanath yogi politics