
सोशल मीडियावर वाघ आणि अजगराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) केला जात आहे.
नवी दिल्ली- सोशल मीडियावर वाघ आणि अजगराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) केला जात आहे. सिंह, वाघ आणि बिबट्याच्या शिकारीचे व्हिडिओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, यावेळी एक वाघ आणि अजगर (Tiger Vs Python) आमनेसामने आले होते. या व्हिडिओला लोकांकडून चांगली पसंती मिळत आले. हा व्हिडिओ जुना असल्याचं सांगितलं जातंय. दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ टाकण्यात आला होता. आता भारतीय फॉरेस्ट सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी या व्हिडिओला ट्विटरवर शेअर केले आहे.
व्हिडिओ कर्नाटकच्या नागरहोल नॅशन पार्क अँड टायगर रिजर्वमधील (Nagarahole Tiger Reserve) असल्याचं सांगितलंय जातंय. 31 ऑगस्ट 2018 मध्ये तो शूट करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये दिसतंय की वाघ जंगलात फिरत होता. त्याच्या मार्गात एक अजगर पडले होते. अजगराने संपूर्ण रस्ता व्यापला होता. यावेळी वाघाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला, पण अजगराने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी वाघाने शहाणपणा दाखवत, आपला मार्ग बदलला आणि अजगराला पूर्ण वळसा घालून पुढे गेला. रस्ता ओलांडल्यानंतर वाघ खूप काळ अजगराला पाहात होता. नंतर तो निघून गेला.
ओडीसाचे CM नवीन पटनायकांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस; लसीकरणाच्या दुसऱ्या...
सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, वाघाने अजगराला पाहून रस्ता सोडला. या व्हिडिओला सुशांत यांनी 21 जूलै रोजी पोस्ट केले होते. याला आतापर्यंत 80 हजार लोकांनी पाहिलं आहे. तसेच 5 हजारांपेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. व्हिडिओला साडेआठशेवेळा रिट्विट करण्यात आले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जंगलात प्राणी कसे गुण्यागोंविदाने राहतात. माणसांनी त्यांच्याकडून शिकायला पाहिजे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं.