
यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला असून पावसाचा जोरही वाढल आहे. यातच आता पावसाळी पर्यटनही सुरू झालं आहे. दरम्यान, एका धबधब्यात वरून झाड कोसळल्यानं दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उत्तराखंडच्या डेहराडून जिल्ह्यात असलेल्या टायगर फॉल धबधब्यात ही दुर्घटना घडली.