कुत्र्यांमुळे 'कान्हा'तील वाघ संकटात! CD व्हायरसच्या संसर्गाने वाघिणींसह ४ बछड्यांचा मृत्यू; वन्यजीवांना धोका

Kanha Tiger Reserve news कान्हा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीसह तिच्या चार बछड्यांच्या एकापाठोपाठ एक झालेल्या मृत्युंमुळे खळबळ उडालीय. कॅनाईन डिस्टेंपर व्हायरसची लागण होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय.
Tigress and Four Cubs Die Due to CD Virus in Kanha Tiger Reserve

Tigress and Four Cubs Die Due to CD Virus in Kanha Tiger Reserve

Esakal

Updated on

वाघांसाठी देशभरात प्रसिद्ध असलेल्या कान्हा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीसह तिच्या चार बछड्यांच्या एकापाठोपाठ एक झालेल्या मृत्युंमुळे खळबळ उडाली आहे. मात्र, टी-१४१ वाघीण व तिच्या बछड्यांचा मृत्यू शिकारीमुळे झाला नसून कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस (सीडीव्ही) या विषाणूमुळे झाल्याचे समोर आले आहे. अभयारण्याशेजारील गावांमधील कुत्र्यांमधून हा विषाणू वाघांपर्यंत पोचल्याचा वन विभागाचा दावा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com