esakal | लहान मुलांसाठी 'कोव्हॅक्सिन'ला अद्याप परवानगी नाही; आरोग्य राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Bharati Pawar

लहान मुलांसाठी 'कोव्हॅक्सिन'ला अद्याप परवानगी नाही; आरोग्य राज्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : दोन ते अठरा वयोगटातील लहान मुलांच्या कोव्हॅक्सिन लसीला अद्याप ड्रग्ज कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) आपत्कालीन वापरासाठी अद्याप मंजुरी दिलेली नाही, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. दुपारी यासंदर्भात लसीला वापरासाठी मंजुरी मिळाल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं, त्यावर आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

भारती पवार म्हणाल्या, या लसीची मुल्यमापन प्रक्रिया अद्याप सुरु असून कोविड-१९ विषय तज्ज्ञ समितीच्या चर्चेत काहीतरी गोंधळ झाल्यानं याच्या मंजुरीची चर्चा सुरु होती. त्यामुळं DCGIनं अद्याप या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेली नाही.

भारत बायोटेकनं यासंदर्भातील क्लिनिकल ट्रायल्सचा डेटा Covaxin (BBV152) CDSCOला सुपूर्द केला होता. या डेटाची CDSCO आणि विषय तज्ज्ञ समितीकडून (SEC) कसून तपासणी केली जात आहे. या तपासणीनंतर त्यांनी या लसीबाबत सकारात्मक शिफारस केली आहे, अशी माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली आहे.

लहान मुलांसाठी कसा असेल डोस?

भारतात तयार करण्यात आलेल्या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. यासाठी दोन डोसमध्ये २० दिवसांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तर मोठ्या व्यक्तींसाठी असलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये ४ ते ६ आठवड्यांचं अंतर आवश्यक आहे.

१२ ते १८ वयोगटासाठी ZyCov-D ला मंजुरी

ऑगस्टमध्ये भारतानं ZyCov-D लसीला १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालिन वापराला मंजुरी दिली आहे. या लसीची निर्मिती Zydus Cadila या फार्मा कंपनीनं केली आहे. ही पहिली डीएनएवर आधारित लस असून याला जगानं मान्यता दिली आहे.

loading image
go to top