Tipu Sultan Palace
esakal
बंगळूर (कर्नाटक) : बंगळूरजवळील प्रसिद्ध टीपू सुलतान (Tipu Sultan) समर पॅलेस येथे एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या ऐतिहासिक पर्यटनस्थळाच्या भिंतीवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे (Lawrence Bishnoi) नाव लिहिल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.