
प्रसिद्ध तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्तास रांगेत ऊभे राहावे लागते पण आता तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने एक नवीन तांत्रिक उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये गर्दी नियंत्रणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI चा वापर केला जात आहे. टीटीडीचा दावा आहे की या प्रणालीद्वारे, जिथे पूर्वी दर्शनासाठी ८ ते १२ तास लागत होते, आता तीच प्रक्रिया फक्त २ तासांत पूर्ण करता येते. ही योजना सध्या चाचणी टप्प्यात आहे आणि गुगल आणि टीसीएस सारख्या मोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने विकसित केली जात आहे.