Tirumala Tirupati : बालाजीची संपत्ती २.५ लाख कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tirumala Tirupati Balaji Devasthan richest temple

Tirumala Tirupati : बालाजीची संपत्ती २.५ लाख कोटी

तिरुपती : देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि जगभरातील सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानकडे सुमारे अडीच लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती देवस्थान समितीने रविवारी दिली. यांमध्ये देवस्थानच्या जमिनी, विविध इमारती, भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या बँकांमधील ठेवी यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे भगवान व्यंकटेश आणि येथील देवतांचे प्राचीन काळापासून असणारे सोन्याचे रत्नखचित अमूल्य दागिने आणि तिरूपती येथे भाविकांच्या सुविधेसाठी बांधण्यात आलेले भक्तनिवास यांच्या व्यतिरिक्त असणारी ही संपत्ती आहे, असे मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पौराणिक मान्यतेनुसार भगवान व्यंकटेशाने पद्मावती देवीशी विवाह करण्यासाठी कुबेराकडून भरपूर कर्ज घेतले होते. ते फेडण्यासाठी भाविक येथे यथाशक्ती दान अर्पण करतात. येथे पैसे अथवा सुवर्णदान केल्याने अक्षय्य संपत्ती मिळते अशी देखील भाविकांची धारणा आहे.

व्याजापोटी ६६८ कोटी

तिरुमला तिरुपती देवस्थानच्या २०२२-२३च्या वार्षिक अंदाज पत्रकानुसार संस्थानला ठेवींच्या व्याजापोटी ६६८ कोटी रुपये मिळणार आहेत, तर वर्षभरात येणाऱ्या भाविकांकडून सुमारे एक हजार कोटी रुपये दक्षिणेच्या स्वरूपात मिळतील असा अंदाज देवस्थान समितीने वर्तवला आहे.

अशी आहे संपत्ती

१०.२५ - टन सोने (३० सप्टेंबर २०२२ अखेर)

९०० - स्थावर मालमत्ता (एकूण सात हजार एकर)

१५,९३८ - कोटी रुपये विविध बँकांमधील ठेवी (३० सप्टेंबर २०२२ अखेर)